Chh. Sambhaji Nagar - शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील तरुणांना गाठत त्यांना चढ्या भावाने गांजा, चरस, नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. अनिल अंबादास माळवे (वय ५१, रा. प्रकाशनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी २५ एप्रिलरोजी दुपारी त्याला अटक केली. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी साडेतीन किलो गांजा (७० हजार), १ हजार ५०० रुपयांचे चरस आणि दोन हजार ५०० रुपयांचे एमडी हे नशेचे औषध जप्त केले.
पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो नारेगावातून गांजा आणून चढ्या दराने तरुणांना विक्री करू लागला. विशेष म्हणजे, वर्षभरात त्याने कितीतरी तरुणांना नशेच्या विळख्यात पान ४ वर
‘हायप्रोफाइल’ तरुण गाठायचा अन् नशेच्या गोळ्या विकायचा!
अडकविले असण्याची शक्यता आहे. ही कारवाई निरीक्षक राजश्री आडे यांच्यासह सहायक निरीक्षक शेषराव खटाणे, उपनिरीक्षक संदीप काळे, दीपक देशमुख, जालिंदर मांटे, ललिता गोरे, संतोष पारधे, संदीप बिडकर, कल्याण निकम, भागीनाथ सांगळे, भीमराव राठोड, योगेश चव्हाण यांनी केली.
पोलिसांना म्हणाला जेवण नको; पण दारू द्या
आरोपी माळवे नशेच्या गोळ्या पुरविण्याबरोबरच स्वतःही कायम नशेत असतो. विशेष म्हणजे, अटक केली तेव्हा तो नशेत तर्रर्र होता. सायंकाळी त्याला पोलिसांनी जेवायचे का? अशी विचारणा केली असता, त्याने पोलिसांना ‘जेवण नको, दारू द्या’ अशी मागणी केली.
मध्यरात्री घर पेटवून दिल्याचे उघड
माळवेविरोधात शहरातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याने जून २०२० साली लॉकडाउनमध्ये मोबाइल दुकान फोडले होते, एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीत २६ सप्टेंबर २०१८ साली मध्यरात्री एका घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याआधी जानेवारी २०१८ मध्ये त्याच्याविरोधात पुंडलिनकगरात घरफोडीचाही गुन्हा दाखल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.