फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंचायत समिती कार्यालयात सुमारे सातशे सिंचन विहिरीच्या फायली पेंडिंग आहे. मग चार वर्षात आतापर्यंत आमदारांना या फायलीचा निपटारा का करता आला नाही.
निवडणुका जवळ आल्यानंतरच का शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरीची काळजी लागली. आमदाराला आठ तास पंचायत समितीत बसणं हे दुर्दैव आहे. एक बीडीओ जर आमदाराच ऐकत नसेल तर आमदारांनी राजीनामा द्यायला हवा असा असे मत माजी आमदार तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, ओबीसी विभागाचे मराठवाडा अध्यक्ष कांचनकुमार चाटे, तालुकाध्यक्ष संदीप बोरसे, युवकचे जिल्हाध्यक्ष वरून पाथ्रीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मतदार संपर्क अभियान व आढावा बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी (ता.23) रोजी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना माजी आमदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, मागील गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना सिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी तीस-पस्तीस हजार रुपये पंचायत समितीत द्यावी लागते ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. प्रशासनावर स्थानिक आमदारांचा वचक असला पाहिजे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदारालाही आठ-आठ तास जर पंचायत समितीत विहिरीच्या संचिका मंजूर करण्यासाठी बसावे लागत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
तसेच काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी भूतनीय गावनिहाय आणि सर्कल न्याय विविध कमिट्या स्थापन करून काँग्रेस पक्षाचे ध्येय व धोरण तळागाळापर्यंत असणाऱ्या माणसापर्यंत पोहोचवा, तसेच नव्याने मतदान नोंदणी होणार असून घरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मतदान नोंदणी करणे सर्वांनी गरजेचे आहे. या थापाड्या सरकारला खाली खेचण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीने काम करावे लागणार असल्याचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी सांगितले.
यावेळी बँकेचे माजी संचालक पुंडलिकराव जंगले, मतदार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, सुभाषराव गायकवाड, सुदाम मते, संतोषराव मेटे, शेख रज्जाक, बाबुराव डकले, मुकेश चव्हाण, पंढरीनाथ जाधव, पंढरीनाथ लहाने, आजिनाथ पायगव्हाण, आदिनाथ भागवत, बबनराव जाधव, दीपक चव्हाण, बाळू वहाटुळे, अंकुश वहाटूळे, सुभाष जाधव, लहू मानकापे, विठ्ठलराव कोलते, राजेंद्र चव्हाण, कचरू मैद, सदाशिव विटेकर, कारभारी वहाटुळे, राहुल सोनवणे, अरुण नरवडे, इद्रिस पटेल, शेख मोईन आदींची उपस्थिती होती.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम : विलास औताडे
ग्रामीण भागात आता होणाऱ्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका असल्याने काँग्रेस पक्ष प्रत्येक कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा आहे. त्याचबरोबर मी आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर काळे हे सुद्धा कार्यकर्त्या सोबत आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पक्षाचे संघटन वाढीसाठी काम करावे.
पक्षाच्या संघटन वाढीसाठी येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सातत्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी घराघरात पोचून येणाऱ्या निवडणुकीत विजय होण्यासाठी संघटन मजबूत करावे असे आवाहन काँग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.