Mp Imtiaz Jaleel : पांढरे कपडे घालणाऱ्यांचे काळे कारनामे पाहिले

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक
Mp Imtiaz Jaleel
Mp Imtiaz Jaleelsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ’अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या आधुनिकीकरणाच्या कामाचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावरील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.

अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रशांत बंब, माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात खासदार इम्तियाज हे काळे कपडे परिधान करून आले होते.

Mp Imtiaz Jaleel
Chatrapati Sambhaji Nagar : परदेशी शिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी १३ ऑगस्टपर्यंतच मुदत

त्यांच्या या पेहरावाची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती. याचा खुलासा करताना खासदारांनी आपल्या भाषणात टोलेबाजी केली. काळ्या कपड्याबद्दल खुलासा करताना, मी निषेध व्यक्त करत नाही. मात्र, पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांचे काळे कारनामे पाहिल्याचे स्पष्ट करतानाच भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना उद्देशून काळ्या कपड्यावर आक्षेप घेऊ नका, असे सुनावले.

Mp Imtiaz Jaleel
Chh. Sambhaji Nagar News : औट्रम घाटात जड वाहनांना बंदी; खंडपीठाचे आदेश, ११ ऑगस्टपासून अंमलबजावणी

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाचा योजनेत समावेश केल्याबद्दल आभार व्यक्त केले. ‘विमानतळाची इमारत अत्यंत आधुनिक आहे, पण विमाने नाहीत. त्यामुळे सध्यातरी ती केवळ एक वास्तू आहे. असे रेल्वेस्थानकाचे होऊ नये’, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक राजेंद्रकुमार मीना यांनी केले. श्री. खंदारे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Mp Imtiaz Jaleel
Chh. Sambhaji Nagar : महानोर यांच्यामुळेच गावाला 'खरी' ओळख; ग्रामस्थांनी व्यक्त केल्या भावना

संजय शिरसाट यांना मंत्री करा!

शहराला सहा मंत्री मिळाले आहेत. आणखी एक मंत्री रांगेत आहेत. माझी इच्छा आहे की, संजय शिरसाट यांनाही मंत्रिपद द्यावे. ते मंत्री झाले तर सात मंत्री होतील. यापेक्षा ‘अच्छे दिन’ काय असू शकतील?, असा खोचक टोला खासदार इम्तियाज यांनी लगावला. ‘डाॅ. भागवत कराड यांनी आपल्या भाषणात देशाच्या सर्व भागांत शहरातून विमानसेवा पोचवण्याची घोषणा करावी. मग आपण अभिनंदन करू. ते घोषणा मोठ्या करतात, प्रत्यक्षात काम काही होत नाही. रेल्वेस्थानकाच्या कामाचा हिशोब आम्ही सहा महिन्यांनी मागू, इमारत बांधून काही होणार नाही, कनेक्टिव्हिटी द्यावी’, अशी कोपरखळीही खासदारांनी मारली.

Mp Imtiaz Jaleel
Chh. Sambhaji Nagar : जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी दिला राजीनामा

‘उडाण’मधून विमाने घेणार उड्डाण

खासदार इम्तियाज यांच्यानंतर डॉ. कराड यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, २४१ कोटी २७ लाख रुपयांचे रेल्वेस्टेशन होणार आहे. मनमाड ते नांदेड विद्युतीकरण झाले. आता केंद्रीय मंत्री दानवेंच्या प्रयत्नाने मनमाड ते संभाजीनगर ९९० कोटींचे टेंडर निघाले आहे. पीटलाईटचे प्रत्यक्ष काम सुरू आहे. यापुढे वंदे भारत ट्रेन, हायस्पीड ट्रेनसाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. तसेच खासदार इम्तियाज यांच्याकडे पाहत सांगितले, की ‘उडाण’ योजनेतून काही विमाने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मंत्री अतुल सावे यांनीही मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी यांच्या काळात ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचा विकास होत असल्याचे स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()