समृद्धी महामार्गावर काल(रविवार) झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. तर २३ प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी' महामार्गावर काल अपघात झालेल्या ट्रकला आरटीओने थांबवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. याच ट्रकला धडकून ट्रॅव्हल्समधील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
हायवेवर गाडी थांबवणाऱ्या दोन अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. प्रदीप राठोड, नितीनकुमार गणोरकर असं या अधिकाऱ्यांचं नाव असून दोघेही आरटीओ असिस्टंट इन्पेक्टर आहेत.
आरटीओ अधिकाऱ्यांनी महामार्गावर तपासणी करण्यासाठी एक ट्रक अडवला होता. भर रस्त्यातच या ट्रकची चौकशी सुरू होती. त्यावेळी पाठीमागून खासगी ट्रॅव्हल्स आली आणि ही ट्रक थांबली आहे की जात आहे याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. दरम्यान, अपघाताच्या काही वेळ आधीचा ट्रक थांबवल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये आरटीओचे अधिकारी ट्रकचालकाची चौकशी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भर रस्त्यातच ही चौकशी सुरू आहे. जर आरटीओ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर ट्रक अडवला नसता, किंवा ट्रकला बाजूला घेऊन चौकशी केली असती, तर हा अपघात झाला नसता, असं अनेकांनी म्हटलं आहे.
आरटीओच्या आधिकाऱ्यांच्या चुकीमुळे १२ प्रवाशांचा जीव गेला, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह एका चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या भीषण अपघातात दहा ते बारा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परत जात असतांना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.