Chh. Sambhaji Nagar Tourism : बोटिंगसोबत नववर्षात घ्या मिनी ट्रेनचा आनंद

पर्यटनवाढीसाठी महापालिकेचा पुढाकार : सिडकोतील नागरिकांसाठी विरंगुळा
chhatrapati sambhaji nagar tourism enjoy mini train in new year along with boating
chhatrapati sambhaji nagar tourism enjoy mini train in new year along with boatingsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : राज्याची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराला दर्जा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात शहरात पर्यटनासाठी सोयी-सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून विविध भागात उद्याने, पर्यटनस्थळे विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको भागातील नेहरू बाल उद्यानातील तलावात डिसेंबरअखेरीस बोटिंग सुरू केली जाणार आहे. त्यासोबतच स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन चालविली जाणार आहे. त्यामुळे सिडको भागातील नागरिक, लहान मुलांसाठी दिवसभराच्या मनोरंजनाची सोय होणार आहे.

ऐतिहासिक सलीम अली सरोवरात कधीकाळी बोटिंगची व्यवस्था होती. सलीम अली सरोवराचा परिसर सुशोभित करण्यासाठी ही बोटिंग बंद करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च करून सरोवराचा परिसर विकसितही करण्यात आला; पण बोटिंग सुरू झाली नाही.

सलीम अली सरोवरातील बोटिंगच्या आवाजामुळे परिसरातील पक्षांच्या वास्तव्यास धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करत शहरातील पक्षिमित्र संघटनांनी बोटिंगला विरोध केला, पुढे हे प्रकरण न्यायालयात गेले. सध्या सलीम अली सरोवर परिसराचा वापरही बंद आहे. त्यामुळे महापालिकेने बोटिंगसाठी नवा पर्याय शोधला आहे.

सिडको भागातील नेहरू बाल उद्यानातील तलावाचा पर्याय शोधून काढला आहे. १० ते १५ वर्षानंतर शहरातील नागरिकांना बोटिंगचा आनंद घेता येणार आहे. नेहरू बाल उद्यानातील तलावाचा अनेक वर्षांपासून वापर होत नव्हता.

त्यामुळे तलावात घाण साचली होती. तलाव स्वच्छ करून त्यात बोटिंग सुरू करण्याची संकल्पना प्रशासक जी. श्रीकांत यांनी मांडली. त्यानुसार इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या तलावाच्या परिसरात विहिरी असून, पाण्याचे झरे देखील आहेत. त्यामुळे पाणी स्वच्छ आहे. आगामी महिनाभरात बोटिंगसाठी आवश्‍यक रॅम्प तयार करणे, तलावाची स्वच्छता अशी कामे केली जाणार आहेत.

महापालिकेच्या वर्धापनदिनी बोटिंग व्यवस्थेसाठी आवश्‍यक असलेल्या कामांचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यासोबत स्वामी विवेकानंद उद्यानात मिनी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय प्रशासकांनी घेतला आहे. ही ट्रेन जानेवारी महिन्यात सुरू होईल, असे नियोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

— विजय पाटील, उद्यान अधीक्षक महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.