Chhatrapati Sambhaji Nagar : अवकाळी पावसाने घेतला पाच पशुधनाचा बळी

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रविवार (ता. पाच) पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून जिल्ह्यात पाच पशुधन दगावले आहे.
Agriculture Loss
Agriculture LossSakal
Updated on
Summary

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रविवार (ता. पाच) पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून जिल्ह्यात पाच पशुधन दगावले आहे.

छत्रपती संभाजी नगर - जिल्ह्यात रविवार (ता. पाच) पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून जिल्ह्यात पाच पशुधन दगावले आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाची ७.८ मिली मीटर इतकी नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात रविवार (ता. पाच) पासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या लखलखाटासह आणि वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पिकांचे तसेच फळपिकांचे नुकसान केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६५ मंडळांमध्ये पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या १० मंडळात ८.९ मिलिमीटर एवढा पाऊस नोंदला गेला आहे.

तसेच पैठण तालुक्यातील १० मंडळांमध्ये ४.८ मिलिमीटर, गंगापूर तालुक्यातील ९ मंडळांमध्ये ११ मिलिमीटर, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांमध्ये ८.९ मिलिमीटर, कन्नड तालुक्यातील ८ मंडळांमध्ये ९.२ मिलिमीटर, सिल्लोड तालुक्यातील ८ मंडळांमध्ये ५.५ मिलिमीटर, खुलताबाद तालुक्यातील ३ मंडळांमध्ये ९.१ मिलिमीटर, सोयगाव तालुक्यातील ३ मंडळांमध्ये ५.२ मिलिमीटर आणि फुलंब्री तालुक्यातील ४ मंडळांमध्ये ७.१ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे.

Agriculture Loss
Accident News: समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, आईवडिलांसमोरच मुलाने सोडला जीव

या अवकाळी पावसाने पिकाबरोबरच पशुधनाचेही नुकसान केले आहे. पैठण तालुक्यामध्ये वीज पडून दोन बैल मरण पावले आहेत. तर छत्रपती संभाजीनगर, वैजापूर आणि फुलंब्री या तीन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक अशा तीन गायी मरण पावल्या आहेत. दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून जिल्ह्यामध्ये एकूण पाच पशुधन दगावल्याचे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()