Chhatrapati Sambhaji Nagar : पाणी पुरवठ्यात पुन्हा बिघाड

साडेचार तास उपसा बंद; अनेक भागात उशिरा पाणी
Chhatrapati Sambhaji Nagar water supply issue
Chhatrapati Sambhaji Nagar water supply issuesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणी पुरवठ्यात तांत्रिक बिघाडामुळे व्यत्यय सुरूच आहे. सोमवारी (ता. २७) जायकवाडी येथे महापालिकेच्या पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणेत सकाळपासूनच तांत्रिक बिघाड झाला.

यामुळे पाणी उपशाचे पंप बंद पडले. दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल साडेपाच तास लागले. या काळात शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे अनेक नळांना उशिरा पाणी आले नाही.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे त्यात वारंवार बिघाड येत असून, सोमवारी पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडामुळे शहराचा पाणी पुरवठा विस्कळित झाला. दोन्ही पाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा सकाळी सहा वाजून ४० मिनिटांपासूनच वारंवार खंडित झाला.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महावितरणच्या अभियंत्यांना याची माहिती दिली. त्यांनी छत्रपती संभाजीनगर फिडरवरील वीजपुरवठा खंडित करून तो जालना योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या फिडरवर जोडला. त्यानंतर सात वाजून ४० मिनिटांनी कर्मचाऱ्यांनी पंपगृह चालू करताच पाण्याच्या दाबामुळे सहाव्या क्रमांकाचा पंप निखळला तर पाचव्या क्रमांकाचा पंप पूर्णपणे जाम झाला.

यानंतर पुन्हा जालना लाइनवरील फिडर बदलण्याचे काम महावितरणच्या अभियंत्यांनी हाती घेतले. दरम्यान याच वेळात महापालिकेने पंपांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. सकाळी साडेअकरा वाजता जुन्या पंपगृहाची दुरुस्ती झाली. दुपारी १२.०५ वाजता नवीन योजनेवरील पंपगृह पूर्ववत झाले.

दरम्यानच्या काळात जुनी योजना चार तास ५५ मिनिटे बंद होती. नवीन योजनेवरील पाणी उपसा पाच तास २५ मिनिटे बंद होता. त्यामुळे दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे पूर्ण होऊ शकले नाहीत. काही भागांना पाच तास उशिराने पाणी मिळाले. काही टप्पे एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले. नागरिकांना सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()