Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: पावसाळ्यातही ४३ गावे, १७ वाड्या तहानलेल्याच

काही गावांत मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहेत. टँकरना ३१ जुलैपर्यंत मुदत आहे.
chhatrapati sambhajinagar 43 village water crisis weather rain forecast monsoon
chhatrapati sambhajinagar 43 village water crisis Sakal
Updated on

करमाड : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ लोटला, तरीही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही. सध्या तालुक्यातील ४३ गावे, १७ वाड्या-वस्त्यांना ५५ टँकरच्या १०६ खेपांद्वारे एक लाख २६ हजार ८१२ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्याला जोरदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यात पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र, अद्याप विहिरी, कूपनलिकांना पाणी न आल्याने अद्यापही टँकर सुरू आहेत. यंदा तालुक्यात मे व जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक ७३ गावे २० वाड्या वस्त्यांना १०० टँकरच्या २०२ खेपांद्वारे दोन लाख ४१ हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात होता.

ही टँकरची संख्या मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कायम होती. त्यानंतर तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील टँकरची संख्या कमी झाली.

मात्र, अद्यापही तालुक्याच्या काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ४३ गावांना, १७ वाड्यांना ५५ टँकरच्या १०६ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर टँकरची गरज भासली होती. मात्र, यंदा पाऊस वेळेवर झाल्याने पुढे टँकरची संख्या वाढली नाही.

या गावांना टँकरने पाणीपुरवठा

सध्या तालुक्यातील सांजखेडा, दरकवाडी, चारठा, जोडवाडी, करंजगाव, कोनेवाडी, डायगव्हाण, कौडगाव जालना, काऱ्होळ, बेगानाईक तांडा (परदरी), महंमदपूर, टाकळी माळी, पिंपळखुंटा, कांचनपूर, शेंद्रा कमंगर व अंतर्गत शिवाजीनगर, लाडसावंगी, वडखा अंतर्गत नाथनगर, दरेगाव, कौडगाव अंबड, शेकटा, वरुड काजी, फत्तेपूर, सय्यदपूर,

औरंगपूर, करमाड, जटवाडा, जोगवाडा, जळगाव फेरण, चितेगावअंतर्गत तांडा-२, सटाणा, गाढेजळगाव, खामखेडा, धोंडखेडा, एकोड तांडा २ व ३, सहस्रमुळी, घारेगाव पिंप्री, जोडवाडी, शेंद्राबन, गंगापूर (जं.), वाहेगाव (रमाईनगर गाढेकर वस्ती), आडगाव सरकअंतर्गत वस्ती व तांडे, रामपूर, पोखरी, भिदोन यासह आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना पाणीपुरवठा करणारे सर्व टँकर तीन ठिकाणी एमआयडीसीच्या पाँइंटवर भरले जात आहेत.

काही गावांत मुबलक प्रमाणात पाऊस न पडल्याने पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहेत. टँकरना ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. त्यानंतरही पाऊस न पडल्यास संबंधित गावातील सरपंचांकडून टँकर मुदतवाढीचा प्रस्ताव आल्यास उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयात प्रस्ताव पाठविण्यात येईल. नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही.

— मीना रायताळे, गटविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.