छत्रपती संभाजीनगर : मैत्रीचा गैरफायदा घेत तिच्या घरच्यांना वारंवार फोन करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. आर्यन प्रमोद गुलाटी (फरिदाबाद, हरियाना) असे आरोपीचे नाव आहे..या प्रकरणात २५ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही एक सप्टेंबर २०२३ मध्ये रॉयल कॉलेज ऑफ आर्टस् लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळी एका मैत्रिणीमार्फत तिची ओळख आरोपी आर्यन गुलाटी याच्याशी झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्याने अनेकदा पीडितेकडून पैसे घेतले होते. पीडितेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती भारतात परतली. १८ सप्टेंबरला पदवीदान समारंभात पीडितेचे वडील व बहीण असे लंडनला गेले होते. त्यावेळी तेथे पीडितेने त्यांची ओळख आरोपीशी करून दिली होती. ता. २३ सप्टेंबरला पीडिता पुन्हा भारतात परतली. त्यानंतर आरोपी पीडितेला वारंवार फोन करून लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. पीडितेने नकार दिल्यानंतरही तो पीडितेच्या आई-वडिलांना फोन करून पीडितेचे लग्न माझ्याशी लावून द्या, असा तगादा लावत होता..सात ऑक्टोबर रोजी आरोपीने पीडितेच्या वडिलांना पीडितेचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व व्हिडिओ सेंड केले होते; तसेच वडिलांना ठार मारण्याची व ॲसिड फेकण्याची धमकी दिली. त्यावर पीडितेने ‘तू मला ब्लॅकमेल करतो का’, असे विचारले असता त्याने ‘तुझ्या वडिलांकडून कसे पैसे काढतो ते बघ’, अशी धमकी दिली. दरम्यान, पीडितेने आर्यनचे फोन घेणे बंद केल्यानंतरही तो इतर मार्गाने फोन लावून त्रास देत होता व मॉर्फ केलेले फोटो नातेवाइकांना टाकून बदनामी करेन, अशी धमकी देत होता. विशेष म्हणजे, आरोपीच्या आई-वडिलांनीदेखील पीडितेच्या वडिलांना फोन करून लग्नासाठी गळ घातली होती. तेव्हादेखील पीडितेने लग्नास नकार दिला. .Aurangabad Crime News: तरुणीकडून उकळले चार लाख.२१ ऑक्टोबरला आर्यनच्या मित्राने पीडितेच्या वडिलांना फोन केला व अश्लील शिवीगाळ करून ‘मी पंजाबमधील एमएलएचा पुतण्या माणिक बोलतो आहे, तुमच्या मुलीचे लग्न आर्यनशी लावून द्या, अन्यथा तुमच्या घरी येऊन तुमच्या मुलीला उचलून नेऊ’, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांना प्रचंड कॉल सुरू झाले. २८ ऑगस्टला आर्यनने पीडितेच्या वडिलांना फोन करून पीडितेला बोलू न दिल्यास नातेवाइकांना फोन करून धमकी देऊ, असे म्हणत शिवीगाळ केली. सातारा पोलिसात गुन्हा दाखल झाला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.