छत्रपती संभाजीनगर : औद्योगिकनगरी म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख असल्याने लोकसंख्येत वाढ होत असून, शहराचा विस्तार होत आहे. अशात शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडून ‘नॅशनल क्लीन एअर’ कार्यक्रम राबविला जात असून शहराची हवा चांगली होत आहे. सध्या जरी शहरात वायू प्रदूषण नियंत्रणात असले, तरी दिवाळीत फटाक्यांमुळे किती प्रदूषण होते, याकडे अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे.