Chh. Sambhajinagar Water Supply : छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा आठ तास बंद

शहराच्या पाणीपुरवठ्यावरील संकटाची मालिका कायम असून, १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रेल्वेस्टेशनसमोर फुटली.
Chh. Sambhajinagar Water Supply
Chh. Sambhajinagar Water SupplySakal

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यावरील संकटाची मालिका कायम असून, १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी रेल्वेस्टेशनसमोर फुटली. त्यासोबतच फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम करण्यात आले. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात तब्बल आठ तासांचा गॅप पडला. अनेक भागांतील टाक्या भरल्या नसल्याने पुरवठा पुन्हा एकदा विस्कळित झाला आहे.

शहराचा पाणीपुरवठा विविध कारणांमुळे वारंवार विस्कळित होत आहे. एका ठिकाणी दुरुस्ती केली तर दुसऱ्या ठिकाणी दोन-चार दिवसांत नवी समस्या उभी राहते. त्यातून मार्ग काढताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

दरम्यान, रेल्वेस्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागली. ही गळती शनिवारी (ता. २२) दुरुस्त करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शनिवारी शहागंज, जिन्सी व दिल्लीगेट भागाचा पाणीपुरवठा बंद असतो, त्यामुळे या काळात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता के.एम. फालक यांनी सांगितले.

Chh. Sambhajinagar Water Supply
Fursungi Water Tanker: पुण्यात पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

या दुरुस्तीसाठी सकाळी आठ वाजता पाणीपुरवठा बंद करण्यात आला, दुपारी दोन वाजता दुरुस्ती पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सहा तासांपर्यंत १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद होता.

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरातील वीज उपकेंद्रातील सीटी (करंट ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दुपारी तीन वाजता वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे १२०० व ७०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आठ तास बंद होती.

Chh. Sambhajinagar Water Supply
Chh. Sambhajinagar : अल्पसंख्याकबहुल भागातील ‘आयटीआय’साठी सहा कोटी; मुंबईत दोन नव्या संस्थांना मान्यता

असे असले तरी जुन्या शहरात पाणीपुरवठा विस्कळित झाला नाही, जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या काळात सिडकोचा पाणीपुरवठा सुरू होता, पण दुपारी तीन ते पाच दरम्यान सिडकोसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल होऊ शकतो, असे के.एम. फालक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com