छत्रपती संभाजीनगर : पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराने एकाच वेळी १५० मर्सिडीज खरेदी केल्या होत्या. याची आठवण येण्याचे कारण म्हणजे, दसरा-दिवाळी सणांदरम्यान शहरातील एका उद्योजकाने तब्बल साडेबारा कोटींची ‘रोल्स-रॉयस फॅन्टम’ या जगातील अत्याधुनिक कारची खरेदी केली आहे. याशिवाय पाच कोटी रुपयांच्या दोन लॅम्बॉर्गिनी आणि एक पाच कोटी रुपयांची मर्सिडीजही खरेदी करण्यात आली आहे. शहरात एकाचवेळी या चार महागड्या कार खरेदी केल्याने आरटीओच्या गल्ल्यात तब्बल ८० लाख रुपये जमा झाले आहेत.