Sambhajinagar Violence : "राष्ट्रवादीने जाणीपूर्वक दंगल पेटवली"; भाजप खासदाराने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Sambhajinagar Violence
Sambhajinagar Violence
Updated on

Sambhajinagar Violence : छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर, राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या घोळक्यानं उत्सवासाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.

पाहता-पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून १३ गाड्या जाळण्यात आल्या होत्या. दरम्यान भाजप खासदाराने मोठा आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ही दंगल पेटवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले, "संभाजीनगरमधील दंगल पेटवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले. राष्ट्रवादीचे लोक कटकारस्थान करत आहेत. संभाजीनगरमधील कटकारस्थान फक्त देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपद सांभळण्यात यशस्वी आहेत की नाही हे पाहण्यासाठी रचण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरुन हे स्पष्ट होते.

"ज्या किराडपुरा भागात दंगल झाली त्याठिकाणी हिंदू समाज राहत नाही. तिथे मुस्लिम राहतात. रामनवमीच्या आधल्या दिवशी तिथे इम्तियाज जलील यांचे राष्ट्रवादीच्या रियाजुद्दीन सोबत भांडण झाले. २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार मौलाना अब्दुल कादिर यांचा रियाजुद्दीन मुलगा आहे," असे बोंडे म्हणाले.

Sambhajinagar Violence
Rahul Gandhi Disqualified : 'मोदीं'विरोधात राहुल गांधीनी थोपटले दंड! 'त्या' निर्णयाला देणार आव्हान

"इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यासाठी लोक आले तेव्हा त्यांनी राम मंदिराचा आसरा घेतला. त्याठिकाणी रियाजुद्दीनची लोक आली. त्यांनी दगडफेक केली. तिथे सर्व दुकाने मुल्सिम समाजाची आहेत. इम्तियाज जलील बाहेर आले नाहीत म्हणून रियाजुद्दीनच्या लोकांनी दुकानावर दगडफेक केली. त्यानंतर इम्तियाज जलील यांचे लोक आले. मग हिंसाचार झाला."

"इम्तियाज जलील एमआयएम आणि राष्ट्रवादीचे अब्दुल कादिर व रियाजुद्दीन यांच्यामध्ये जे भांडण झाले. याची सुरुवात राष्ट्रवादीच्या रियाजुद्दीने केली. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी  रियाजुद्दीचे फोन कॉल चेक करावे. कोणाच्या सांगण्यावरून यांनी दंगल भडकवली, याची चौकशी करावी", अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे,"

दोन मुस्लिम गटामध्ये वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेस संभाजीनगरमध्ये गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या पाठिमागे कोणीतरी मोठा हात आहे. कारण दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होतात. फक्त एवढ्यासाठी दंगल भडकवण्यात आली, असा आरोप बोंडे यांनी केला आहे. 

Sambhajinagar Violence
Sharad Ponkshe: सावरकरांचे विचारच देशाला तारू शकतात.. 'त्या' घटनेवर अखेर शरद पोंक्षे बोललेच..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.