Chhatrapati sambhajinagar : पाणीपुरवठा एक दिवस पुढे

होळी, धुलीवंदनाला मिळाले नाही पाणी
Water supply
Water supplyesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : फारोळ्यातील नवीन आणि जुन्या पंपगृहात बिघाड झाल्याचा फटका शहरातील नागरिकांना बसला. ऐन सणासुदीत होळीला पाणी मिळाले नाही. त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशीही पंप हाऊसमध्ये बिघाड झाल्याने घराघरात पाण्याच ठणठणाट झाला. आता महापालिकेने काही भागात उशिराने आणि काही टप्पे एक दिवसाने पुढे ढकलले आहेत.

पैठण तालुक्यात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे सबस्टेशन यार्डमध्ये स्पार्कींग होऊन पंपिंग बंद झाली. पाईपलाईन लिकेजच्या वेल्डिंगचे आणि सबस्टेशनमधील दुरुस्ती काम पूर्ण करून पंपिंग पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी पूर्ववत करण्यात आली. साडेसहा तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला.

त्यामुळे मंगळवारी केला जाणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. मंगळवारी धुलीवंदनाच्या दिवशी अनेक भागाला पाणी मिळाले नाही. त्यातच मंगळवारी दुपारी पुन्हा १२.४५ वाहता पंपहाऊसमधील मोकब ब्रेकरमध्ये फॉल्ट होऊन पुन्हा पंपिंग ट्रीप झाली होती.

ते दुरुस्ती होऊ शकत नसल्याने त्यास बायपास करून त्याजागी नवीन बस-बार बसविण्यात आले. यात साधारणपणे अकरा तास पाणी पुरवठा बंद होता. या बंदच्या काळात ट्रान्सफॉर्मरचे ऑईल लिकेज झाले होते. त्यानंतर आवश्यक दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्रीपासून पंपिंग पूर्ववत सुरू करण्यात आली.

विभागाची दिलगिरी

होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. दोन दिवसाचा खंड पडल्याने अगोदरच पाच दिवसाआड मिळणारे पाणी आता आठ दिवसानंतरच मिळणार आहे. त्यामुळे अनेक भागातील रहिवाश्यांनी खासगी टॅंकरद्वारे पाणी विकत घेतले.

फारोळा येथील पंपिंग सुरू केल्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजता जलकुंभात पाणी आले. ज्या भागाला मंगळवारी पाणी पुरवठा झाला नाही त्या भागाला दुपारनंतर पाणी दिले जाणार आहे. मात्र, संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. पाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.