औरंगाबादच्या २२ गावांतील ३० बालविवाह रोखले, तिला शिकू द्या ओ!

Child_marriage
Child_marriage
Updated on

औरंगाबाद : तुमच्या मुलीचे शिक्षण पूर्ण झालेले नाही, पुढचे सर्व शिक्षण थांबून जाईल. लग्नासाठी तिची शारीरिक व मानसिक (Child Marriage In Aurangabad) तयारी झालेली नाही. लग्नानंतर तिला येणाऱ्या अडचणी. त्यामुळे होणारे कौटुंबिक वाद, या सगळ्या गोष्टीला तिला वारंवार सामोरे जावे लागेल. त्यामुळे तिला आता शिकू द्या, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिच्या लग्नाचा विचार करा, असा संवाद साधत हेडगेवार अंतर्गत सावित्रीबाई महिला एकात्मिक समाज मंडळ या सामाजिक संस्थेच्या संवादिनी ताई मार्फत २२ गावांतील ३० बालविवाह (Child Marriage) रोखले आहे. या सामाजिक संस्थेच्या मार्फत जिल्ह्यातील फुलंब्री (Phulambri), गंगापूर (Gangapur), औरंगाबाद (Aurangabad) तालुका तसेच शहरातील ब्रिजवाडी, मुंकदवाडी, मिलिंदनगर येथील वस्त्यांमध्ये किशोरी विकास प्रकल्प चालविला जातो. या प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील २२ गावातील मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासावर काम करून जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देशाने काम करण्यात येते.(child marriages stopped in aurangabad district glp88)

Child_marriage
मरणार असलो तरी तुम्ही चांगले जगा! मित्रांना पाठवला शेवटचा निरोप

या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत गेल्या तीन वर्षात ३० बालविवाह रोखण्यास संस्थेला यश आले आहे. गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून संस्था या विषयावर काम करत असून गावातील संवादिनी ताईच्या मार्फत हे बालविवाह रोखण्यात येत आहे. दरम्यान, ग्रामीण भागात नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची, दीड वर्षापासून कोरोनामुळे कमी खर्चात लग्न उरकून टाकून जबाबदारीतून मुक्त होणे तसेच ग्रामीण भागात लग्नाच्या वयात आलेल्या मुलांची संख्या जास्त असल्यामुळे लग्नाला मुली मिळत नाही, यामुळे मुलांच्या पालकांकडून हुंडा देण्याची मागणी येत असल्यामुळे पालक तत्काळ लग्नाचा निर्णय घेतात. तसेच सुरक्षिततेच्या कारणामुळे पालक मुलींच्या लग्नाचा निर्णय घेतात.

Child_marriage
शेतमजुराच्या लेकीला मिळाली दृष्टी, डोळ्यांतून आनंदाश्रू ढाळत!

१२० गावात विविध विषयावर काम

सावित्रीबाई महिला एकात्मिक समाज मंडळ सामाजिक संस्थेच्या मार्फत ग्रामीण भागातील १२० गावांत विविध विषयावर काम केले जाते. ७० गावांत आरोग्य, २२ किशोरी विकास प्रकल्प, १२ दोस्ती (मुलींसाठी) व फुलोरा (मुलांसाठी) असे प्रकल्प चालविण्यात येते. आरोग्य, शिक्षण, कौशल्य, शेती, जल संवर्धन, जल-जमीन- जंगल या विषयावर काम करण्यात येते. तसेच ग्रामीण भागात संजीवनी प्रकल्प, मानसिक आरोग्य तसेच नऊ गावात ओपीडी(बाह्य रुग्णालय) चालवली जाते.

Child_marriage
नांदेडमध्ये कोरोना रुग्णसंख्येत घट, फक्त ५ जण पाॅझिटिव्ह

शहरात बालविवाहाची समस्या जास्त भयानक आहे. संस्थेच्या वतीने दोन गटात मार्फत काम करण्यात येते. तसेच शहरी भागात डॉक्टर जवळच उपलब्ध असल्याने मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करुण बालविवाह रोखला जातो.

- डॉ. प्रसन्न पाटील, संचालक प्रकल्प.

बालविवाह संदर्भात माहिती मिळताच किशोरी विकास प्रकल्पातंर्गत काम करणाऱ्या संवादिनी ताईच्या मार्फत गावात जाऊन पालकांशी प्रत्यक्षात संवाद साधून समुपदेशन करण्यात येते. अशा प्रकारे बालविवाह रोखला जातो.

-पूजा वैष्णव, प्रकल्प समन्वयक, किशोरी विकास प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.