रताळ भाषा वापरत असेल तर त्या PI चा निषेध करते : चित्रा वाघ

प्रेम प्रकरणातुन पोटाच्या मुलीची भाऊ व आईने हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
chitra vagh
chitra vaghesakal
Updated on

वैजापूर (जि.औरंगाबाद) : प्रेम प्रकरणातुन पोटाच्या मुलीची भाऊ व आईने हत्या केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे एक पीआय योग्य तपास करने सोडून हत्या झालेल्या महिलेच्या पतीला 'तुला काय करायचे आता लग्नाचे सर्टिफिकेट घेऊन तुझी बायको तर गेली' अशी रताळ भाषा वापरून वागणूक देतात. अखेर पोलिस कुणाची चाकरी करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. तालुक्यातील (Vaijapur) लाडगाव शिवारात हत्या झालेल्या कुटुंबाची गुरुवारी (ता.नऊ) वाघ यांनी भेट घेतली. त्यावेळी कुटुंबासोबत चर्चेदरम्यान त्यांनी विरगाव पोलिसावर आक्रमक टीका करत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारला. तालुक्यातील लाडगाव शिवारात रविवारी दुपारी कीर्ती अविनाश थोरे या विवाहित महिलेची प्रेम प्रकरणाचा मनात राग असलेल्या भाऊ व आईने कोयत्याने शिर कापून हत्या केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,या पिडित कुटुंबाला चित्रा वाघ यांनी गुरुवारी दुपारी भेट दिली. यावेळी त्यांनी मृत किर्ती यांचे पती अविनाश थोरे व कुटुंबातील महिलांची भेट घेवून चर्चा केली. (Aurangabad)

chitra vagh
Chitra Wagh|शिवीगाळ प्रकरणी संजय राऊतांवर कारवाई करा : चित्रा वाघ

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापती यांनी या घटनेची व पोलिस करत असलेल्या तपासची माहिती वाघ यांना दिली. दरम्यान चर्चेदरम्यान अविनाश यांनी वाघ यांना सांगितले की विरगाव पोलिस ठाण्यातील पीआय नरवडे यांच्याकडे माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्राची मागणी केली असता त्यांनी मला 'तुला काय करायचे आता लग्नाचे सर्टिफिकेट घेवून तुझी बायको तर गेली' अशा शब्दात खडसवल्याचे सांगितले. या नंतर वाघ यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी पीआय नरवडे यांचा निषेध व्यक्त करत उपविभागीय अधिकारी प्रजापती यांना विशेष लक्ष देण्याची मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक शैलेश चव्हाण, शैलेश पोंदे, संदीप पवार आदींची उपस्थिती होती.

chitra vagh
आशिष शेलार शिवसेनेविरुद्ध बोलतात म्हणून गुन्हा दाखल : फडणवीस

'एसपी'ची प्रशंसा 'पीआय'ला फटकारले

घटनास्थळी चित्रा वाघ यांनी सांगितले की काही महिन्यांपूर्वी पैठण तालुक्यात दरोडेखोरांनी दोन महिलेवर बलात्कर केले होते. यावेळी मी घटनास्थळी भेट देऊन औरंगाबादचे नवनियुक्त एसपी निमित्त गोयल यांची भेट घेतली होती. गोयल हे अत्यंत हुशार व सवेदनशील अधिकारी आहे. मात्र,पुन्हा त्यांच्याच जिल्ह्यात अशी दुसऱ्यांदा घटना झाली. मला विश्वास आहे, ते योग्य तपास करतील. मात्र,विरगाव ठाण्यातील पीआय नरवडे पीड़ित कुटुंबाला योग्य सहकार्य व मदत करणे सोडून त्या महिलेच्या पतीला सांगतो 'तुला काय करायचे आता लग्नाचे सर्टिफिकेट घेऊन तुझी बायको तर गेली' अशी रताळ भाषा वापरत असेल तर त्या पीआयचा मी जाहिर निषेध करते. व त्याची तक्रार एसपी साहेब व गुहखात्याकडे करून त्याची चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान वाघ यांनी एकीकडे 'एसपी'ची प्रशंसा तर 'पीआय'ला फटकारल्याने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.