कोरोनामुळे बाजारपेठेत ड‘रोना’!

Cinema Theater, Prozon Mall Remain Close
Cinema Theater, Prozon Mall Remain Close
Updated on

औरंगाबाद : जगात ‘कोरोना’चा तर शहरातील बाजारपेठेवर कोरोनामुळे ‘डरोना’चा परिणाम दिसत आहे. सर्वसामान्यांनी या विषाणूचा चांगलाच धसका घेतला. शहरातील बाजारपेठा सुरू असल्या तरी ग्राहक फिरकतच नसल्याने रविवारी (ता. १५) सुटीच्या दिवशीही शुकशुकाट होता. शासनाच्या आदेशाने रविवारी प्रोझोन मॉलही बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. 


राज्य शासनाने तातडीने प्रमुख शहरातील मॉल, जलतरण तलाव, व्यायामशाळा, नाट्यगृह, म्युझियम हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार रविवारीपासूनच यांची अंमलबजावणी सुरू झाली. शहरातील बाजारपेठा सुरू आहेत. बाजारपेठा सुरू असल्या तरी ग्राहकच नसल्याने बाजारपेठेत सध्या शुकशुकाट आहे. रविवार-शनिवारी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी असते; मात्र दोन दिवसांपासून खरेदीसाठी असणारी गर्दी ओसरली आहे. 
खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....
व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान 
शहरातील कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, सराफा बाजार, ज्वेलरी मार्केट या बाजारपेठेतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होते; मात्र दोन-तीन दिवसांपासून ही उलाढाल निम्म्याहून अधिक घटली. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या पुढील अडचणीत आणखी वाढ झाली. ऐन लग्नसराईच्या हंगामात अचानक ग्राहकांची संख्या कमी झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त झाले असून, येत्या काही दिवसांत ही संख्या आणखी कमी होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

प्रोझोनमधील १०४ शॉप बंद 
राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनंतर मराठवाड्यातील सर्वांत मोठा मॉल असलेला प्रोझोन मॉल रविवारपासून पुढील निर्णय येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मॉलमधील १०४ विविध दुकानचालकांनाही याविषयी कल्पना देण्यात आली आहे. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना कळवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळच नोटीस लावण्यात आल्या आहेत. मॉलच्या माध्यमातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या मॉलला दरदिवशी हजारो लोक भेटी देतात. 

कोरोनाच्या विषाणूमुळे सिनेमागृहे तसेच प्रोझोन मॉल बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. बाजारपेठा बंद राहणार नाहीत. बाजारपेठा नियमितप्रमाणे सुरू आहे; मात्र ग्राहकांची संख्या रोडावली आहे. बाजारपेठा बंद ठेवणे हा उपाय नाही. आमची रोजीरोटी व्यापारावर अवलंबून असल्याने आम्ही बाजारपेठा बंद ठेवू शकत नाही. 
- अजय शहा, माजी अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ. 

कोरोनाच्या धास्तीने सर्वसामान्य बाजारपेठेकडे फिरकत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. यामुळे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे. मॉल, सिनेमागृह बंद केले तरी बाजारपेठा बंद राहणार नाहीत. अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी आजही सर्वसामान्य बाहेर निघत आहेत; मात्र या वस्तूंची गरज नाही ती घेण्याचे तो टाळत आहे. 
- जगन्नाथ काळे, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्या सूचनेनुसार रविवारी सकाळपासून प्रोझोन मॉल बंद ठेवण्यात आला आहे. अशा सूचनाही मॉलमधील शॉपधारकांना देण्यात आल्या आहेत. सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत मॉल बंद राहणार आहे. 
- आकाश जोशी, प्रोझोन मॉल 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()