धाराशिव : येथील जिल्हा क्रीडा संकुलात वैयक्तिक आणि सामूहिक आशा वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण दररोज शेकडो खेळाडूंना दिले जाते. मात्र इथे शासकीय क्रीडा मार्गदर्शकच नाहीत. खाजगी मार्गदर्शकाकडून काम भागविणे सुरू आहे. वैयक्तिक पाच, सामूहिक पाच आणि अथेलेटिक्सच्या कांही खेळांचा येथे दररोज सराव केला जातो.
वैयक्तीक खेळात कुस्ती, कराटे, तायक्वांदो, स्केटिंग, धनुर्विद्या. मैदानी खेळात लॉनटेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, खो-खो, अथेलेटिक्समध्ये, रनिंग, जम्पिंग आदी खेळांचा सराव करण्यासाठी शेकडो जण क्रीडा संकुलात येतात. प्रत्येक खेळांचा ३० ते ३५ जण रोज सराव करतात. सर्वाधिक दोनशे जण बॅडमिंटन खेळांचा सराव दररोज करत असतात. बॅडमिंटन वगळता अन्य खेळांच्या सरावाला येथे कसलेही शुल्क आकारले जात नाही.
बॅडमिंटन या एकाच विभागाकडून बॅडमिंटन बंदिस्त हॉलच्या देखभालीसाठी मासिक ८० हजार रुपये आकारले जातात. अन्य खेळांच्या विभागाची देखभाल आणि दुरुस्ती या आणि व्यापारी संकुलातून येणाऱ्या मासिक भाड्यातून भागविली जाते. यात वीज देयक, स्वच्छता आणि किरकोळ खर्च भागावला जातो, अशी माहिती जिल्हा क्रीडा विभागातून सांगण्यात आली आहे.
सध्या खासगी क्रीडा मंडळांकडे या खेळांचा सराव घेण्यासाठी संबंधित बंदिस्त आणि मैदानी विभाग देण्यात आले आहेत. खासगी मंडळेच त्या त्या ठिकाणी खासगी मार्गदर्शक नेमून सराव घेत आहेत. बॅडमिंटन वगळता अन्य खेळांचा सराव येथे नि:शुल्क आहे. मात्र संबंधित विभागांचे खासगी प्रशिक्षक सराव करणाऱ्याकडून नियमित शुल्क घेतात. मात्र क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी कसलाही सहभाग देत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
येथे क्रीडा मार्गदर्शकांची तीन, तालुका क्रीडाधिकारी एक, कनिष्ठ लिपिक एक आणि शिपाई एक अशी आठ पदे रिक्त आहेत. रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांकडून या पदांची कामे भागविली जात आहेत. यामुळे येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना मूळ तांत्रिक माहितीसह सरावाचे त्या-त्या खेळांचे मार्गदर्शन करणारे कोणीही जबाबदार शासकीय प्रशिक्षक नाही. परिणामी कामचलाऊ सराव सर्रास चालू असल्याचे चित्र आहे.
या बाबत जिल्हा क्रीडाधिकारी श्रीकांत हरनाळे यांना विचारणा केली असता. त्या त्या खेळातील खासगी संस्था खासगी प्रशिक्षक नेमून त्या-त्या खेळांचे सराव घेत आहेत. बॅडमिंटन वगळता अन्य कोणत्याही खेळांच्या सरावासाठी शुल्क घेतले जात नाही. बॅडमिंटन आणि व्यापारी संकुलातून मिळणाऱ्या रकमेतून देखभाल केली जाते, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.