Coffee with Sakal : ‘मातोश्री’बद्दल कधीही वाईट बोलणार नाही - आमदार प्रदीप जैस्वाल

काम करणाऱ्या माणसाला पदाशी काहीही देणेघेणे नसते.
pradip jaiswal
pradip jaiswal sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - ज्या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला महापौर, आमदार, खासदार केले, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल किंवा ‘मातोश्री’त राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल मी कधीही वाईट बोलणार नाही. सत्ताधारी पक्षातील मंत्री, आमदार आणि अपक्ष असे ५० लोक बाहेर पडतात, यामागे काहीतरी कारण निश्चितच असेल. ते कारण म्हणजे मतदारसंघातील कामांना लागलेला ब्रेक आणि मिळत नसलेला निधी हे होते.

त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील विकासकामांना गती मिळाली. या एका वर्षात ३० वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लागली आहेत. यापुढेही विकासाची कामे होत राहतील, असा विश्वास मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये व्यक्त केला.

श्री. जैस्वाल म्हणाले, सर्वसामान्य लोकांच्या रस्ते, पाणी अशा प्राथमिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो. मोठ्या पदासाठी माझा आग्रह नसतो. पदापेक्षा कामे करणे महत्त्वाचे आहे. मी या शहरात नगरसेवक, महापालिकेत स्थायी समिती सभापती, महापौर, आमदार, खासदार राहिलेलो आहे. आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघाच्या विकासकामांसाठी अनेकवेळा मागणी करूनही निधी मिळत नव्हता.

pradip jaiswal
Chh. Sambhaji Nagar : खा. इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास भरल्या बांगड्या

कामे होत नसतील तर आमदार म्हणून माझा समाजाला काय उपयोग? केवळ याच एका कारणाने मी व माझ्यासारखे ४० ते ५० आमदार सत्तेतून बाहेर पडले. हे एकाचवेळी घडलेले नाही, आमदार, मंत्र्यांची नाराजी उद्धव ठाकरे यांच्या कानावर वेळोवेळी घातली होती. एकनाथ शिंदे स्वतः पाचवेळा त्यांच्याशी बोलले. पण त्यावर काही विचार झाला नाही. त्यामुळे आमच्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आता जुन्या पक्षातील नेते, लोकप्रतिनिधी यांच्याबद्दल वाईट बोलण्यात मी वेळ घालवत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()