औरंगाबाद: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे ‘ब’ आणि ‘क’ टप्प्याचे उद्घाटन आज शनिवारी देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक विषयावर भाष्य केलं आहे. न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत त्यांनी आपली मते मांडली. न्यायव्यवस्थेत बदल व्हावेत, हे सांगताना देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी, अशीही अपेक्षा व्यक्ती केली आहे. मात्र, त्यांनी बोलताना नामोल्लेख टाळत परमबीर सिंगांना टोला देखील लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी म्हटलंय की, आमच्याकडे तक्रारदार गायब आहे, मात्र खटला सुरुच आहे, अशी परिस्थिती आहे. नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले की, आज अप्रतिम अशा न्यायमंदिराचं लोकार्पण होत आहे. या न्यायमंदिराच्या भूमीपूजनाला मी नव्हतो पण झेंडा लावायला मी आलो आहे. ही इमारत पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत, असं मला वाटतं. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात मात्र, ही वास्तू पाहण्यासाठी यावं लागेल. लोकांना पकडून आणण्याची वेळ येता कामा नये, असंही मिश्किलीने ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, तारीख पे तारीख मध्ये सर्वसामान्य पिचला जातो. न्याययंत्रणा गतीमान होण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करु, असं देखील त्यांनी वचन दिलं आहे. तसेच हायकोर्टाची नवीन इमारत उभी करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे.
लोकशाहीचे स्तंभ कुणाच्याही दबावाने कोसळू नयेत तसेच समाज एवढा सुधारला पाहिजे गुन्हेगारी नष्टच झाली पाहिजे आणि देशातले कोर्ट रिकामे पडले पाहिजेत, अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरण रिजीजू, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय उमेश ललित, न्यायमूर्ती डॉ. डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती ए. एस. ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, अॅडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सी. सिंग आणि राज्य शासनाचे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोनी हे देखील उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.