QR Code: क्यूआर कोड स्कॅन करताच तक्रारींचे निरसन

QR Code: नागरिकांचे समाधन झाले नाही तर त्यांनी संबंधित पोलिस ठाणे-एसीपी ऑफिस येथील क्यूआर कोड आपल्या मोबाइलवर स्कॅन करून प्रतिक्रिया ऑनलाइन नोंदवावी.
QR Code
QR CodeSakal
Updated on

QR Code: बऱ्याच वेळा नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार करतात. मात्र, त्यांच्या तक्रारी टोलवून दिल्या जातात. कधी तक्रारीचे समाधान होत नाही. ही बाब परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त नवनीत कॉवत यांनी गांभीर्याने घेतली. आता ‘नागरिकांच्या प्रतिक्रिया’ ही क्यूआर कोड प्रणाली सुरू करण्यात आली. यामध्ये कोड स्कॅन करून प्रतिक्रिया नोंदवल्यास त्या तक्रारीचे तत्काळ निराकरण होणार आहे.

पोलिस उपायुक्त परिमंडळ २ अंतर्गत ९ पोलिस ठाणी आणि दोन सहायक पोलिस आयुक्तांची कार्यालये आहेत. या ठाण्यांमध्ये किंवा कार्यालयात विविध नागरिक भेट देत आपले शासकीय काम, तक्रारी, समस्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर मांडतात. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक वागणूक भेटत नसल्याच्या काही तक्रारी उपायुक्त कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या.

या तक्रारींचे निराकरण व्हावे, याकरिता पोलिस आयुक्त संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त कॉवत यांनी नवीन उपक्रम राबवला आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाणे आणि एसीपी ऑफिसच्या प्रवेश दर्शनी भागात ‘नागरिकांच्या प्रतिक्रिया’ या मथळ्याखाली क्यूआर कोड स्कॅनर लावण्यात आले.

QR Code
कुपोषित बालकांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाकडून आहारात बदल

अशी द्या प्रतिक्रिया

नागरिकांचे समाधन झाले नाही तर त्यांनी संबंधित पोलिस ठाणे-एसीपी ऑफिस येथील क्यूआर कोड आपल्या मोबाइलवर स्कॅन करून प्रतिक्रिया ऑनलाइन नोंदवावी.

नागरिकांनी नोंदवलेली प्रतिक्रिया थेट पोलिस उपायुक्तांना प्राप्त होणार आहे. ज्या नागरिकांची प्रतिक्रिया असमाधानकारक असल्यास त्याबाबत संबंधित पोलिस ठाण्याला विचारणा होऊन त्या तक्रारीचे निरसन करण्यात येणार आहे.

नागरिकांनी आपल्या सकारात्मक-नकारात्मक प्रतिक्रिया क्यूआर कोडमध्ये असलेल्या १ ते १० रेटिंगनुसार नोंदवाव्यात.

या उपक्रमामुळे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामकाजामध्ये गती येऊन नागरिकांच्या तक्रारी सोडवणे सुलभ होणार आहे.

पोलिस अधिकारी आणि नागरिक यांच्यातील ‘कम्युनिकेशन गॅप’ कमी होणार असून, त्यांच्यात सुसंवाद निर्माण होईल. यामुळे नागरिकांना वरिष्ठांकडे दाद मागण्याची गरज भासणार नाही.

काही प्रकरणांत नागरिक पोलिस ठाण्यात थेट तक्रार देण्यासाठी घाबरतात. त्यामुळे क्यूआर कोड प्रणालीमुळे नागरिकांना थेट वरिष्ठांकडे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com