काँग्रेस आक्रमक, अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी औरंगाबादेत आंदोलन

Congress Agitation Against Arnab Goswami
Congress Agitation Against Arnab Goswami
Updated on

औरंगाबाद : औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्णब गोस्वामीच्या अटकेसाठी शुक्रवारी (ता.२२) काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, जयप्रकाश नारनवरे, सरोज पाटील, भाऊसाहेब जगताप, किरण पाटील डोणगावकर यांच्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की रिपब्लिक टीव्हीचे संपादन अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर गोस्वामींना घटनेच्या तीन दिवस आदीच होती. असे या संभाषणातून स्पष्ट दिसत आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामींकडे कशी आली, असा प्रश्‍न काँग्रेसतर्फे विचारण्यात आला. अर्णब गोस्वामी यांचे हे कृत्य गोपनीय कायद्याचे भंग करणारे आहे. पण हा देश द्रोहाचा प्रकार आहे. त्यामुळे गोस्वामीला तात्काळ अटक करुन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस समितीने केला आहे.


गोस्वामी आणि त्याच्या रिपब्लिक टीव्हीने अनेक बेकायदेशीर कृत्य केली असून दूरदर्शनची उपग्रह वारंवारिता बेकायदेशीरपण वापरून प्रसार भारतीचे करोडो रुपयांचे नुकसानही केले आहे. रिपब्लिक टीव्हीने दूरदर्शनला पैसे न देता त्यांच्या फ्रिक्वेन्शी वापरणे हा सुद्धा गुन्हा आहे. हा गुन्हा टीआरपी घोटाळ्याची चौकशी करताना या बेकायदेशीर कृत्याचीही चौकशी करणे गरजेजे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या अर्णब गोस्वामीवर व त्यांच्या इतर साथीदारांनी जनतेचा पैसा लुबाडणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी यासह विविध मागण्या केले गेले.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.