महालगाव (जि.औरंगाबाद) : महालगावसह (ता.वैजापूर) परिसरात पावसाळ्याच्या सुरवातीला वेळेवर जून महिन्यात पावसाचे आगमन दमदार झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकच्या पेरण्या ८० टक्के पूर्ण झाल्या. परंतु पुढचे सर्वच नक्षत्रचा पाऊस जोरदार पडत राहिल्याने ओढे नाले खळखळुन वाहुन धरणाच्या पाणीपातळीत वाढ होऊन विहीरी तुडुंब भरल्या आहे.
पाणीपातळी जमिनीबरोबर आल्याने बोअरवेलमधून पाणी वाहत असल्याचे चित्र महालगाव, भगुरसह परिसरात बघायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून जमिनी उपळा झाल्याने कपाशी पिवळी पडुन बाजरी, ऊस, मूगच्या शेंगाला मोड फुटले. भुईमुगाची नुसती वाढ झाली असून शेंगांचे प्रमाण कमी आहे. तूर, मका तसेच सततच्या पावसाने सचिन थोरात यांच्या कांदा चाळीला पाणी लागल्याने तीनशे क्विंटल कांदा चाळीत सडल्याने मोठे नुकसान झाले. फळबागामध्ये पपाई, डाळिंब व महेंद्र शेळके यांच्या पेरुच्या झाडाला फळधारणाच झाली नसल्याने बागाचे नुकसान झाले आहे. अशीच परिस्थिती काही दिवस राहिल्यास जमिनीतला ओलावा कमी होत नसल्याने पिके पिवळी पडुन पिके हातची जाती की काय अशी चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.
पावसाने जून महिन्यातच सरासरी ओलंडली आहे.जुलै महिन्यात मध्ये ३६९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ता. ३० जुलै रोजी येथील सर्व शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे. यासाठी तहसीलदार निखिल धुरळकर यांना भगूर येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. रविवारी(ता.सहा) सायंकाळी पाचच्या सुमारास सुसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यात ज्ञानेश्वर झिंजुर्डे, दादा काळे यांचे ऊस पिक खाली पडुन नुकसान झाले, तर येडु बनकर यांची बाजरी आडवी होऊन नुकसान झाले आहे. सर्वांत जास्त फटका महालगाव, भगूर, एकोडी सागज या गावांना बसला आहे. रविवारी ४२ मिमि पावसाची नोंद झाली आहे.
(संपादन - गणेश पिटेकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.