पैठण : यंदा जून महिन्याच्या प्रारंभापासून पाऊस सुरू आहे. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरूच आहे. पाच महिने होत आले तरी पाऊस थांबत नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी खरीप पिके काढणीनंतर रब्बी पेरणीच्या तयारीसाठी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, यावर्षी रब्बीच्या पेरण्या पावसामुळे लांबणार असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत. खरीप पिकाला अडथळा निर्माण होत असून रब्बीच्या पेरणीसाठी शेतीची मशागतही करता येत नाही. त्यामुळे चांगला पाऊसकाळ होऊनही शेतकरी अडचणीत आहेत.