छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर नेत्यांच्या बॅग तपासणीवरून सुरू झालेले वादळ शांत झाले नसून, गुरुवारी (ता. १४) छत्रपती संभाजीनगर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या बॅगा व साहित्याची तपासणी करण्यात आली.