अंधारी : यावर्षी शेतकऱ्याच्या घरात मका नव्हता तोपर्यंत अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मक्याला होता, आता मका सोंगणीचा हंगाम सुरू होत नाही तोच हे भाव निम्म्यावर आल्याचे पाहून शेतकरी हताश झाले आहेत.
सिल्लोड तालुक्यातील अंधारी परिसरात कापूस, अद्रक व सोयाबीन हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, गेल्या एक-दोन वर्षांपासून या पिकांना खर्चाच्या मानाने भाव मिळत नसल्याने यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली.
सध्या परिसरात पूर्वहंगामी कापसाचे बोंडे फुटू लागली असून सोयाबीन व मका सोंगणीला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली असतानाच तालुक्यात परतीच्या पावसाची रिपरिप सुरू झाल्याने सर्वच पिके धोक्यात सापडली.
काही शेतकऱ्यांनी अशाही परिस्थितीत आपल्या शेतातील सोयाबीन व मका थोडीफार खुलवाट पाहून काढणीला सुरुवात करून हा माल मार्केटमध्ये विक्रीला नेला असता वातावरणाचा फायदा व त्यात मॉश्चर कमी असल्याच्या कारणातून व्यापाऱ्यांनी संधी साधून मातीमोल भावात हा माल खरेदी करण्यावर भर दिला आहे. सध्या तेहतीसशे ते चौतीसशेचे दर सोयाबीनला व मक्याला केवळ तेराशे रुपये प्रतिक्विंटलचा भाव बाजारपेठेत मिळत आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकरी संकटात सापडला आहे.
पीक काढणीला परतीच्या पावसाचा फटका
पूर्वहंगामी कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस फुटला असल्याने हा कापूस या पावसामुळे भिजला आहे. पिकांना कोंब फुटले असून शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले.
खिशाला चणचण भासत असल्यामुळे नाइलाजाने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मक्का विकावी लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या मक्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांचा भाव द्यायला हवा. — लक्ष्मण पांडव, शेतकरी, अंधारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.