पाचोड (औरंगाबाद): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (covid 19 effect) बाजारपेठा बंद असल्याने फळभाज्याचे भाव कमालीचे गडगडले असून टोमॅटोसह उन्हाळी फळभाज्याचे उत्पादन घेणारे शेतकरी पडलेल्या दरामुळे टोमॅटो, बटाटे व कोबी गुरांना वैरण म्हणून दावणीत टाकत असल्याचे चित्र पाचोड (pachod) (ता.पैठण) परिसरात पाहवयास मिळते. विक्रीसाठी तोडणीलाही टोमॅटो, बटाटे व फुलकोबी परवडत नसल्याने बहुतांश शेतकरी (corona impact on farmer) ते तसेच शेतात ठेऊन गुरांना वैरण म्हणून वापरत आहेत.
पाचोड परिसरातील वडजी, देवगाव व कुतबखेडा ही गावे भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असून टोमॅटोचे, बटाटे व फूलकोबीचे आगार म्हणून ओळखली जातात. गेल्या वर्षभरापासून भाजीपाला व टोमॅटो आदी फळभाज्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असल्याने उत्पन्न देण्याऐवजी तोटाच देत आहे. आज ना उद्या बाजार खुले होऊन दोन पैसे मिळतील या अपेक्षेने वर्षभरापासून फळभाज्या विक्रेते नवनवीन फड लागवड करून उत्पन्न काढत आहे ,परंतु त्यांच्या नशिबी तोटाच येत असल्याने ते आता हतबल झाले आहेत.
मध्यंतरी टाळेबंदीत सूट मिळाल्यानंतर बऱ्यापैकी हातात पैसा खुळू - खूळू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहवयास मिळत होता, मात्र हे फार काळ टिकले नाही. २५० ते ३०० रुपये प्रति कॅरेट पर्यंत मजल गाठणारे टोमॅटो तर तीस रुपये किलोचा भाव मिळविणारे बटाटे आता कमालीचे घसरले आहे. आता कोरोनामुळे टोमॅटोचे प्रति सत्तर रुपये कॅरेट तर बटाटे आठ रुपये प्रति किलो विक्री होत आहे.
टोमॅटोचे एक कॅरेट तोडण्यापासून वाहतुकीसाठी साठ रुपये खर्च येत असून केवळ पदरात आठ ते दहा रुपये शिल्लक राहत असल्याने ते आता तोडणीला परवडत नसल्याने त्याची गुरांना वैरण दिल्यास अवांतर वैरणीचा खर्च वाचतो असे, वडजी येथील टोमॅटो उत्पादक धर्मराज भांड यांनी सांगितले.
बटाटे उत्पादक बापुराव गाडेकर म्हणाले,"बटाटे लागवडीसाठी पंधरा रुपये किलो दराने बेणे आणले, त्यावेळी चाळीस रुपये किलो बटाट्यास भाव होता, ज्यावेळी आमचा बटाटा काढणीस आला तेव्हा लॉकडाउन सुरू झाले, अन् भाव प्रति किलो आठ रुपये मिळू लागला. टोमॅटो व बटाटे नाशवंत असल्याने त्यांची विक्री करण्याशिवाय पर्याय उरला नाही, मात्र काढणी व वाहतुकीचा खर्च निघत नसल्याने त्याचा गुरांना खाऊ घालण्याशिवाय पर्यायच नाही"
टोमॅटो तोडणी व बटाटे काढणी खर्च जाता पदरात काहीच पडत नसल्याने बटाटे व टोमॅटो उत्पादकांची परवड सुरू आहे. विविध ठिकाणचे बंद असलेले आठवडी बाजार याचा फळभाज्या खरेदी विक्रीवर परिणाम झाला असल्याचे शेतकरी सुधाकर सरोदे यांनी सांगितले. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोला खर्च परवडणारा दर मिळत नसल्याने टोमॅटो न तोडण्यास पसंती दिली तर बटाटे बळीराम किंवा नांगर चालवून काढणी केली जात असल्याने अर्धनिम्मे बटाटे खराब निघून त्यासही दर नसल्याने पशुधनाचे ते खुराक बनत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.