Corona Updates: चिंताजनक! सलग दुसऱ्या दिवशी औरंगाबादमध्ये 500 पेक्षा जास्त नवीन रुग्ण

covid 19 aurangabad.
covid 19 aurangabad.
Updated on

औरंगाबाद: राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात 500 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. मागील दोन-तीन महिन्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला होता पण अचानक रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने काळजी म्हणून आजपासून अंशतः लाकडाउन लावले आहे.

मागील 24 तासांत राज्यातही रेकॉर्ड ब्रेक कोरोना रुग्ण वाढले आहेत. बऱ्याच दिवसानंतर राज्यातील प्रतिदिन कोरोना रुग्णांचा आकडा 13 हजारी पार गेला आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, औंरगाबाद, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात दिवसेंदिवस नवीन कोरोना रुग्ण रेकॉर्ड करत आहेत.

गेल्या 24 तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 231 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.  त्यामध्ये मनपा हद्दीती 188 जण तर ग्रामीण भागातील 43 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील 49 हजार 613 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर नवीन 532 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 54 हजार 439 झाली आहे.

कोरोनाने आजपर्यंत एकूण 1 हजार 311 जणांचा मृत्यू झाला असून सध्या एकूण 3 हजार 515 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे-

मनपा (443)घाटी परिसर (6), हरीराम नगर  (1),आदित्य नगर (2), सातारा परिसर  (4), आयएमए हॉल (1), एन-8 सिडको (4), पीर बाजार (1), जालन नगर (2), स्टेशन रोड परिसर (2), बीडबाय पास परिसर (9), मयूर पार्क (3), सिडको  (12), मुकुंदवाडी (3), कैलास नगर (2),संजय नगर (2), एन-5 सिडको (4), एन-9 सिडको (3), उस्मानपुरा (4), शहानूरवाडी (6), पिसादेवी रोड परिसर (1), त्रिमूर्ती चौक (2),भवानी नगर (2),चिकलठाणा (2),एन-6 सिडको (5),पडेगाव (2), अजबनगर (2), तापडिया नगर (1), हिंदुस्थान आवास (2),एसबीएच कॉलनी (3), पुष्प नगरी (4), शिल्प नगर (1), औरंगपुरा (1), श्रीनिकेतन कॉलनी (1), बालाजी नगर (7), वेदांत नगर (2), कांचनवाडी (1), ज्योती नगर (2), एन-2 सिडको (8), प्रताप नगर (4), गारखेडा (6), पुंडलिक नगर (4),

बन्सीलाल नगर (2),रेल्वे स्टेशन परिसर (5),  पद्मपुरा (1), एकनाथ नगर (1),जाधववाडी (1),नाथ व्हॅली रोड परिसर (1),जटवाडा (2),टिव्ही सेंटर (1), समर्थ नगर (2), शाह कॉलनी (1),  उल्कानगरी  (9),मनीष कॉलनी (1), शेरवन टावर (2), सराफा रोड (1), हायफिल्ड प्रा.लि (1), हर्सूल (8),शास्त्री नगर (2),शाकुंतल नगर (1),न्यायमूर्ती नगर (1), शाह बाजार (1), हडको (3), नवीन मोंढा (1), शिवेश्वर कॉलनी (1), माऊली नगर (4), बजाज हॉस्पिटल (1), पैठण रोड परिसर (1), जयसिंगपूरा (1), एन-3 सिडको (1),म्हाडा कॉलनी (1), हायकोर्ट परिसर (2), टाऊन सेंटर (1), एन-4 सिडको (4), कामगार चौक (1), जय भवानी नगर (7),संघर्ष नगर (1), शाहनगर (1), हनुमान नगर (4), हॉटेल फर्न रेसिडेन्सी (1), एन-7 सिडको (5), आकाशवाणी (3),स्वामी विवेकानंद नगर (1),खिवंसरा पार्क (1),बजरंग चौक (2), शिवाजी नगर (7), संदेश नगर (1),

गजानन नगर (1), गादिया विहार (1), मेहेर नगर (1),विष्णू नगर (3), मयूरबन कॉलनी (1), देवळाई परिसर (3), चौरंगी हॉटेल (1),  सिंधी कॉलनी (3),शंभू नगर (1), अग्निहोत्री चौक (1), शिवशंकर कॉलनी (3), कलेक्टर ऑफीस परिसर (1), सिंधू कॉलनी (1), नक्षत्रवाडी (1),  शिवनेरी कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), सेंट्रल नाका (2),  टिळक नगर (3),  सुराणा नगर (2),  राम नगर (1), सदानंद नगर (1), सह्याद्री नगर सिडको (1),   दशमेश नगर (2), श्रेय नगर (2), इटखेडा (3), आरटीओ ऑफिस परिसर (1), सिद्धार्थ नगर (1), राधामोहन कॉलनी (1), खडकेश्वर (1), नागेश्वरवाडी (2), अन्य (162)

ग्रामीण (89)-
गंगापूर (1), करमाड (2),वरुडकाझी (1), बजाज नगर (16), वडगाव (4), वाळूज महानगर (4),सिडको महानगर (2),पंढरपूर (1), वळदगाव (1),पैठण(1),खुलताबाद(1),शेंद्रा  (2), वडगाव (1),  अन्य (52)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू- 
घाटीत माळीवाडा, औरंगाबाद येथील 64 वर्षीय पुरूष, हुसेन कॉलनी, गारखेडा येथील 70 वर्षीय पुरूष, सांगवी, लासूर स्टेशन येथील 75 वर्षीय पुरूष , खुलाताबाद तालुक्यातील आझमपूर येथील 60 वर्षीय स्त्री आणि खासगी रुग्णालयांमध्ये नारळीबाग येथील 37 वर्षीय पुरूष, क्रांती चौकातील 70 वर्षीय स्त्री, श्रद्ध हॉस्पीटल परिसरातील 71 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()