पुन:श्‍च कोरोनायन! शहरात सुरू होणार कोविड सेंटर

तिसऱ्या लाटेचा धोका कोविड सेंटर सुरू
third wave Covid Center
third wave Covid Centersakal
Updated on

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या (Corona infection) दुसऱ्या लाटेत सुरू करण्यात आलेले १९ कोविड सेंटर (Covid Center) महापालिकेने मध्यंतरी रुग्ण संख्या कमी होताच बंद केले होते. आता तिसऱ्या लाटेचा धोका वाढल्याने ‘पुनःश्‍च कोरोनायन’ करत महापालिकेने सोमवारपासून (ता. १०) पाच कोविड सेंटर, वॉररुम सुरू केले जाणार असल्याने आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. (Aurangabad Municipal Corporation)

शहरात काही दिवसात दररोज शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा विचार करता तिसऱ्या लाटेत तिप्पट रुग्ण आढळून येतील, असा अंदाज बांधला जात असल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. काही महिन्यांपासून बंद असलेले कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहेत. पहिल्या टप्यात चार सेंटर सोमवारपासून सुरू केले जातील, असे श्री. मंडलेचा यांनी सांगितले. त्यात किलेअर्क (३०० बेडस), एमआयटी कॉलेजचे दोन वसतिगृह (३७५ व १७५ बेडस), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतिगृह (४५० बेडस), देवगिरी महाविद्यालयाचे मुला-मुलींचे वसतिगृह (४८० बेडस), आयएचएम कॉलेजचे वसतिगृह (८० बेडस) ही पाच कोविड केअर सेंटर्स अधिगृहीत करून सोमवारपासून सुरू केली जाणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यासाठी सर्व चाचणी केंद्रावर ॲन्टीजेन चाचणीची सुविधा राहील. त्यामुळे हायरिस्कमधील नातेवाईक व संपर्कातील व्यक्तींची तातडीने चाचणी होईल. गरज पडल्यास याठिकाणी आरटीपीसीआर चाचणी देखील केली जाणार आहे.

डॉक्टर साधणार रुग्णांसोबत संवाद

कमी तीव्रता असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने वॉररुम तयार केली असून, येथून रुग्णांसोबत दिवसातून दोनवेळा संपर्क साधून रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करतील. त्यासोबत होम आयसोलेशनमधील रुग्णांना वॉररूमध्ये संपर्क साधण्यासाठी क्रमांक दिला जाणार आहे. होम आयसोलेशनसाठी आपल्या भागातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधून आपले नाव नोंदवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.