Chalo App : आता घरबसल्या शहर बसचे तिकीट ;‘चलो’ ॲपची सुविधा,लोकेशनही कळणार

स्मार्ट सिटी अभियानातर्फे चालविण्यात येणारी स्मार्ट शहर बस आणखी स्मार्ट झाली आहे. बुधवारपासून (ता. १९) प्रवाशांसाठी ‘चलो’ ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहे.
Chalo App
Chalo Appsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटी अभियानातर्फे चालविण्यात येणारी स्मार्ट शहर बस आणखी स्मार्ट झाली आहे. बुधवारपासून (ता. १९) प्रवाशांसाठी ‘चलो’ ॲप उपलब्ध करून दिले जाणार आहे. या ॲपद्वारे प्रवासी ऑनलाइन तिकीट व पास काढू शकतात; तसेच बस कुठे आहे, याचे लोकेशनही ॲपच्या माध्यमातून कळणार आहे.

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत १०० बस खरेदी करून शहर वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली स्मार्ट बस शहरातील नागरिकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रवाशांना जास्तीत-जास्त सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी मुंबईतील बेस्टच्या धर्तीवर ‘चलो’ ॲप सुरू करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार बुधवारपासून ही सुविधा सुरू केली जात आहे. नागरिकांना गुगल प्ले स्टोअरमधून ‘चलो’ ॲप डाउनलोड करता येईल, त्याद्वारे प्रवासी ऑनलाइन पद्धतीने घरी बसून तिकीट खरेदी करू शकतात, पास घेऊ शकतात. यूपीआय, नेट बॅंकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा मोबाइल वॉलेटच्या माध्यमाने पैसे भरता येतील. या ॲपच्या माध्यमातून बस कुठे आहे? कोणत्या थांब्यांवर किती वेळात येईल? हे ॲपद्वारे लक्षात येईल.

बसमध्ये किती सीट रिकाम्या आहेत, याचीही माहिती मिळणार आहे. प्रवाशांना ‘चलो कार्ड’ रिचार्ज करून वापर करता येईल. तिकिटाचे पैसे देण्यासाठी गरज असेल तेवढ्या रुपयांचा टॉपअप करावा लागेल, अशी माहिती स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली व मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.

रेल्वेमध्ये टीसी म्हणून मी काम केलेले असल्याने या अनुभवामुळे तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखून हे ॲप सुरू करण्यात आला आहे. बसला उशीर होत असेल, पण बसच्या येण्याची निश्‍चित वेळ माहिती असेल, तर त्यानुसार बसस्टॉपवर पोचता येते. या ॲपच्या माध्यमातून नागरिक स्मार्ट शहर बससेवेचा फायदा घेऊ शकतात.

— जी. श्रीकांत, सीईओ स्मार्ट सिटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com