औरंगाबादमध्ये कोरोनाच्या एका रुग्णावर सरासरी १८ हजार रुपये खर्च

कोरोना संकटाच्या काळात सरकारकडून औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला २५३ कोटी रुपये मिळाले होते
covid 19
covid 19covid 19
Updated on

औरंगाबाद: दुसऱ्या लाटेत कोरोनाने (covid 19 second wave) मराठवाड्यात मोठा फटका बसला आहे. कधीकाळी मराठवाड्यातून प्रतिदिन उच्चांकी ८ हजारांच्या आसपास रुग्ण वाढले होते. त्यामध्ये औरंगाबाद कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रशासनाचे प्रयत्न, नागरिंकाचा चांगला प्रतिसाद आणि योग्य नियोजनाने कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणली आहे. कोरोनाकाळात जिल्हा प्रशासनाकडून १२३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. औरंगाबादच्या रुग्णसंख्येत सध्या कमालीची घटली जिल्हा रुग्णसंख्येच्या पहिल्या टप्प्यात (level 1) मध्ये असल्याने उद्यापासून जिल्ह्यात अनलॉक (unlock) होण्याची शक्यता आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण म्हणाले, सरासरी काढली असता प्रशासनाकडून आतापर्यंत प्रतिरुग्ण उपचारासाठी १८ हजार रुपये खर्च झाले आहेत. यामध्ये सर्व आरोग्य सुविधांचा समावेश होतो. कोरोनाच्या दोन्ही लाटेत प्रशासनाकडून १२३ कोटी रुपये खर्च झाले असून हा सगळा खर्च कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आणि कोरोनासंबंधी इतर कामावर झाला आहे.

covid 19
PHOTOS: जगप्रसिद्ध वेरूळच्या लेण्यांची सैर करा फोटोंमधून

कोरोना संकटाच्या काळात राज्य सरकारकडून औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला २५३ कोटी रुपये मिळाले होते. यादरम्यान ११.५१ लाख जणांनी कोरोची चाचणी केली होती त्यामधील १.४३ लाख जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तसेच कोरोनाच्या दसऱ्या लाटेमध्ये बेडची संख्या, उपचाराच्या सोयी, आयसीयू बेड आणि व्हेटीलेटरची संख्या दुप्पट केली होती. यामध्ये शहरी तसेच ग्रामीण भागाचाही समावेश आहे. सध्या प्रशासनाकडे १३० कोटींचा निधी शिल्लक असून कोरोनासाठी जिल्हा प्रशासन पुर्ण तयार असल्याचेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

covid 19
World Bicycle Day: असाही एक देश जिथं पंतप्रधान जातात सायकलीवरून संसदेत

या काळात प्रशासनाने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवरही चांगले लक्ष दिले होते. कोरोनाने आतापर्यंत जिल्हात औरंगाबाद महापालिका भागात १ हजार ८५० तर ग्रामीण भागात १ हजार ३५० मृत्यूंची नोंद झाली आहे. तर दुसऱ्या लाटेत महापालिका क्षेत्रात ९६० तर ग्रामीण भागात जवळपास १ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्हा रुग्णसंख्येत पहिल्या टप्प्यात असल्याने उद्यापासून जिल्ह्यातील रेस्टॉरंट्स, मॉल्स, मैदानं, वॉकिंग ट्रॅक्स, खासगी आणि सरकारी कार्यालयं 100 टक्के सुरु, सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळ्यांना परवानगी, जीम, सलून, आंतरजिल्हा प्रवास आणि ई-कॉमर्स सुविधा सुरु होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.