शंभरात पाच टक्के मुलांनाच कोरोनाची गंभीर लक्षणे!

संभाव्य तिसरी लाट, ९५ टक्के बालकांमध्ये आढळतात सौम्य लक्षणे
kids
kidskids
Updated on

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of covid 19) सुमारे ३० टक्के लहान मुले व तरुणांना बाधा झाली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता आहे; मात्र शंभरपैकी पाच टक्के मुलांमध्येच कोरोनाची गंभीर लक्षणे (covid 19 symtoms in kids) आढळून येत असून उर्वरित ९५ टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळत आहेत. मुलांमधील कोविडची लक्षणे वेळीच ओळखून त्यांना वैद्यकीय उपचार त्वरित मिळायला हवेत, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाच्या धोक्याची शक्यता ‘एक्स्पर्ट सायंटिफिक ॲडव्हायजरी कमिटी’ने वर्तविली आहे. लसीकरण व हर्ड इम्युनिटीसह कोरोनाबाधित झालेल्यांमध्ये १८ वयोगटापेक्षा वरच्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता असुरक्षित वयोगट शून्य ते १८ वर्षांचा आहे. बालकांमधील कोविडची लक्षणे सर्दी, तापच न राहता वेगळीही असू शकतात. त्यामुळे बालकांची काळजी आतापासूनच घेणे खूप गरजेचे आहे. ‘आयएमए’च्या एका परिसंवादात डॉ. रेणू बोराळकर यांनी काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या.

kids
PET Exam: पेटचा दुसऱ्या टप्प्याची नोंदणी सोमवारपासून

कोविडची मुलांमधील सौम्य लक्षणे ओळखा

-दोन दिवसांतील अंतरामध्ये मुलांमधील ताप उतरतो का हे तपासा.
-तापेदरम्यान मुले खेळतात की फक्त झोपून राहतात हे तपासा.
-साधा ताप असल्यास ताप उतरतोही तेव्हा बाळ खेळते. खाणे-पिणेही करतो.
-जेव्हा कोविडसारखी लक्षणे असण्याची शक्यता असते तेव्हा ते मलूल राहतो. त्याला काहीच करावेसे वाटत नाही.
-‘ट्रेन्ड ऑफ फिव्हर’ बघितल्यानंतर हे जाणून घ्या की घरात कुणाला काही त्रास आहे का?
-लहान मुलांचा कुणाशी संबंध आला, क्लोज कॉन्टॅक्ट तपासा.

अशी ओळखा लक्षणे

-घरात पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर तपासा.
-३० टक्के मुलांमध्ये मंदगतीची लक्षणे असतात.
-त्यात दोन ते चार दिवस ताप येणे, त्या बरोबरीने सर्दी, खोकला,
घसा दुखणे, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी होते.
-सोबतच सौम्य उलटी, संडास लागणे, पोट दुखणे यासह दम लागतो.
-बेशुद्धावस्थेत जाणे हे तीव्र लक्षण तीन ते पाच टक्के मुलांमध्ये असते.

kids
मराठवाड्यातील मराठ्यांचा ओबीसीत समावेशासाठी न्यायालयात याचिका

वेळीच निदान अन् लगेच उपचारही

४० टक्के ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’ निगेटिव्ह येऊ शकते. त्यामुळे ‘आरटीपीसीआर’ टेस्टही करायला हवीच. माइल्ड लक्षणे असतील तर ‘पॅरासिटामॉल’ औषधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये. पाणी जास्त व भरपूर खाणे श्रेयस्करच. चाचणीचा अहवाल येईपर्यंत मुलांना मास्कही आवश्‍यकवेळी घालायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.