औरंगाबाद: मराठवाड्यात रुग्णसंख्येत घट होत असल्याचे मंगळवारीही (ता. ११) पाहायला मिळाले. दिवसभरात चार हजार ७१७ रुग्ण आढळले. जिल्हानिहाय वाढलेली रुग्णसंख्येमध्ये बीड १२५८, औरंगाबाद ७४८, उस्मानाबाद ६७६, परभणी ६१९, लातूर ५९२, जालना ३९४, नांदेड २९०, हिंगोलीत १४० रुग्णांची भर पडली. उपचारादरम्यान, १२८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात लातूरमध्ये ३०, बीड २१, परभणी १८, औरंगाबाद १७, नांदेड १४, उस्मानाबाद ११, जालना १०, हिंगोलीतील सात जणांचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांची संख्या २ हजार ७९६ वर गेली आहे. घाटी रुग्णालयात सतरा जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील महिला (वय ८५), समतानगर येथील पुरुष (७०), पैठण येथील पुरुष (४५), सिल्लोड येथील पुरुष (६५), वैजापूर येथील पुरुष (५५), कुतुबपुरा येथील महिला (६६), सिल्लोड येथील पुरुष (६८), रमानगर येथील पुरुष (६५), पडेगाव येथील पुरुष (५६), गंगापूर येथील पुरुष (६८), सिल्लोड येथील महिला (६१), सिल्लोड येथील महिला (७४), गंगापूर येथील महिला (६५), सिडको एन - आठ औरंगाबाद येथील महिला (४८), ढाकेफळ येथील पुरुष (६१) बीड बायपास, औरंगाबाद येथील महिलेचा (६०) समावेश आहे. खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील पुरुषाचा (७८) मृत्यू झाला.
औरंगाबादेत ७४८ बाधित, एक हजार बरे
औरंगाबाद जिल्ह्यात ७४८ कोरोनाबाधित आढळले. यात महापालिका क्षेत्रातील २६८, ग्रामीण भागातील ४८० रुग्ण आहेत. रुग्णसंख्या १ लाख ३३ हजार ७७२ झाली. बरे झालेल्या आणखी १००४ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ५५०, ग्रामीण भागातील ४५४ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख २३ हजार ७९५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७ हजार १८१ जणांवर उपचार सुरू आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.