Crime : 'मी या हद्दीचा दादा, माझ्या नादी लागू नको नाहीतर गेम करेन' म्हणत तरुणावर चाकूने सपासप वार

सातारा पोलिसात याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
crime news
crime news esakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मित्रांसोबत हॉटेलात जेवण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय बांधकाम मजूरावर ‘मी सातारा हद्दीचा दादा आहे, अट्टल गुन्हेगार आहे, माझ्या नादी लागायचे नाही, तू इथून निघून जा’, नाहीतर तुझा आज गेमच करतो’ असे म्हणत एकाने चाकूने सपासप वार केले तर इतर दोघांनी डोक्यात बिअरच्या बॉटल्स फोडल्या.

ही घटना ११ जूनरोजी सायंकाळी बीड बायपास रस्त्यावरील टिल्लूज हॉटेलमध्ये घडली. या घटनेत मजूर तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही खांद्यावर वार झाले आहेत. याप्रकरणी तिघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून अजय ठाकूर (रा.बावनघर) असे आरोपीचे नाव आहे.

जखमी लक्ष्मण बंडु कांबळे (२५, हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर) याने फिर्याद दिली. त्यानुसार लक्ष्मण हा त्याचे मित्र मनोज ससाणे, अजय गायकवाड यांच्यासोबत बीड बायपासवरील हॉटेल टिल्लूज येथे जेवण करण्यासाठी गेले होते. तिथे अगोदरच आरोपी अजय ठाकूर, अरुण शिंगारे व संतोष खरे (रा. मिलिंदनगर) आणि एक अनोळखी असे चौघेजण जेवण करत होते.

crime news
Viral Video : शेतकऱ्याचा नाद! पोरगं टपावर नांगर शेतावर; थेट नांगराला जुंपली 'थार'

दरम्यान, लक्ष्मण हा मित्रांसोबत दुसरीकडे जेवण करत असताना अजय याने जवळ येऊन ‘तु मला यानंतर सातारा परिसरात दिसू नको, मी सातारा हद्दीचा दादा आहे, मी अट्टल गुन्हेगार आहे, माझ्या नादी लागायाचे नाही’ असे म्हणाला. त्यावर फिर्यादीने ठीक आहे, मी साताऱ्यात राहत नाही असे म्हणत जेवणाचे बील देत असताना अजय याने पाठीमागून येत फिर्यादीची कॉलर धरुन ‘आज तुझा गेमच करुन टाकतो, तु मेला आता’ असे म्हणत त्याने लक्ष्मणच्या छातीवर वार केला, तो वार चुकविला असता, त्याच्या खांद्यावर लागला.

दुसराही वार चुकवला असता, तोही खांद्यावर लागला, दरम्यान लक्ष्मण घायाळ झाला त्याच वेळेस अरुण आणि संतोष या दोघांनी लक्ष्मणच्या अंगावर बिअरच्या बाटल्या फोडल्या. ही घटना घडत असतानाच फिर्यादीच्या मित्रांनी पळ काढला.

crime news
Rahul Gandhi Truck Video : राहुल गांधी काय गप्प बसेनात; परदेशातही केला ट्रकने प्रवास

दरम्यान, कसेबसे स्वतःचा जीव वाचत लक्ष्मण घरी गेला असता त्याला नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यात नेले. दरम्यान पोलिसांनी मेडीकल मेमो देऊन घाटीत पाठविले. दरम्यान लक्ष्मणच्या फिर्यादीवरुन अजय ठाकूर याच्यासह तिघांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.