Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpur
Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpurSakal

Crime news : लग्न झाल्यानंतर महिनाभरातच सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या

हुंडा दिला नाही म्हणून छळ
Published on

छत्रपती संभाजीनगर : लग्न झाल्यानंतर महिनाभरातच सासरच्या मंडळींनी नवविवाहितेचा छळ करणे सुरु केले. लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पतीला कार घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये म्हणत पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केला.

या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार १५ जून रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान मुन्सी कॉलनी पडेगाव येथे घडला. याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच मंडळींविरोधात छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे. शेख सानिया शेख शफीक (२० वर्ष रा. मुन्सी कॉलनी, पडेगाव) असे त्या मृत नवविवाहितेचे नाव आहे. तर शफिक रऊफ शेख असे त्या अटकेतील आरोपी पतीचे नाव आहे.

Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpur
Mumbai Crime: नवऱ्यानं बायकोला पेट्रोल टाकून भररस्त्यात पेटवलं! रिक्षावाल्यानं वाचवले प्राण

यासंदर्भात मृत विवाहितचा भाऊ समीर कदीर शेख (२३, रा. पीरबावडा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्या बहिणीचा (मृत सानिया) विवाह १५ मे २०२३ रोजी आरोपी शफिक सोबत झाला होता. ती एकूलती एक असल्याने चांगले लग्न लावून दिले होते. मात्र लग्नात हुंडा दिला नाही म्हणून लग्न झाल्यापासून सानियाचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. अखेर छळ सहन न झाल्याने तीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणाची आरोपी पतीसह सासरा रऊफ युसुफ शेख, सासु शहाजान रऊफ शेख, ननंद शाहीस्ता शेख रऊफ, चुलता अक्रम शेख युसुफ शेख (रा. सर्व पडेगाव) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

Crime News Suicide by writing eighteen-page letter nagpur
Crime news: अल्पवयीन मुलीवर मुंबईला नेऊन अत्याचार करणाऱ्यास आरोपीस वीस वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

गुन्हा दाखलशिवाय मृतदेह न घेण्याचा पवित्रा

मृत सानियाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्यानंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी छळ करणाऱ्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी पतीला १६ जून रोजी रात्री पावणे नऊ वाजेदरम्यान अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक गणेश केदार करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.