Crime : कपाटाचे लॉक दुरुस्त करायला आला अन् दागिने चोरून गेला

चावी बनविणाऱ्या अनोळखी संशयिताविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Atrocity case filed against former corporator for threatening to kill  person by using caste abuse
Atrocity case filed against former corporator for threatening to kill person by using caste abuseesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : घरातील लॉक दुरुस्त करण्यासाठी आलेल्या कारागिराने त्याच कपाटातील तिजोरीतून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना एन-७, अयोध्यानगरात १६ जून रोजी दुपारी पावणेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी चावी बनविणाऱ्या अनोळखी संशयिताविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Atrocity case filed against former corporator for threatening to kill  person by using caste abuse
Sambhaji nagar crime : वकिलास मारहाण करून घर जाळण्याचा प्रयत्न ;तिघांना दोन दिवस पोलिस कोठडी

याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती एन-७, अयोध्यानगर भागात राहते. दरम्यान राहत्या घरातील कपाटाचे लॉक दुरुस्त करण्यासाठी दोघा पती,पत्नींनी एका कारागिराला बोलाविले होते.

Atrocity case filed against former corporator for threatening to kill  person by using caste abuse
Crime news : ‘फादर्स डे’ला पित्याकडून मुलाची हत्या

कारागीर कपाटाचे लॉक दुरुस्त करत असताना त्याने फिर्यादी महिलेच्या पतीची नजर चुकवून कपाटातील तिजोरीवर डल्ला मारला आणि तिजोरीतील २० हजारांची अंगठी, १६ हजारांचे गळ्यातील लॉकेट, चार हजारांच्या कानातील बाळ्या, दोन हजारांचे चांदीचे हातातील कडे, दोन भार वजनाच्या चौदाशे रुपयांच्या चांदीच्या बाहोट्या, रोख दहा हजार असा एकूण ५३ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार तडवी हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.