Crime News : उन्हाळ्यात घर उघडे ठेवून झोपताय? मग चोरी झालीच म्हणून समजा!

पैशांचे पाकिट सारखा महागडा ऐवज सोबत,उशाला घेऊन झोपणेही महागात पडू शकते
crime update chhatrapati sambhaji nagar youth mobile theft from house police
crime update chhatrapati sambhaji nagar youth mobile theft from house policeesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरु झाला, तरी अवकाळी पावसामुळे शहरातील वातावरण काहीसे थंड होते. मात्र, मागील दहा ते बारा दिवसांपासून कडक उन्हाळा सुरु झाल्याने उकाडा जाणवत आहे.

त्यामुळे अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपतात, परिणामी चोरट्यांना घरफोडी करण्याची गरज पडत नाही, थेट घरात घुसून चोरी होत असल्याने अनेकांची घरे साफ झाली आहेत. विशेष म्हणजे, अशा चोऱ्या होणारे नागरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, तर कोणी विद्यार्थी, कामगार आहेत.

उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो. त्यामुळे नागरिक घराचा दरवाजा अर्धा उघडा ठेवणे किंवा गॅलरीचा दरवाजा पूर्ण उघडा ठेवणे, सहज प्रवेश करता येणाऱ्या खिडक्या उघड्या ठेवणे अशा बाबींमुळे चोरट्यांना घरात प्रवेश करणे सहज शक्य होते.

crime update chhatrapati sambhaji nagar youth mobile theft from house police
Crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ तर मुलीचा विनयभंग करुन धमकी; 10 जणांवर गुन्‍हा दाखल

त्यामुळे गरमीपासून वाचण्यासाठी घराचा दरवाजा उघडा ठेवाल तर आर्थिक फटका बसेल, याशिवाय अनेकदा चोरटे धारदार वस्तूने वार करण्यासारखे प्रकारही करतात, घराचा दरवाजा उन्हाळ्यात उघडे ठेऊन झोपणे किंवा घर लावून मोबाईल, पैशांचे पाकिट सारखा महागडा ऐवज सोबत,

उशाला घेऊन झोपणेही महागात पडू शकते, त्यामुळे अशा गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत जवळपास १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दररोज दोन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना दरवाजा उघडा राहिल्याने, खिडकी, गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवल्याने घडल्याचेही समोर आले आहे.

crime update chhatrapati sambhaji nagar youth mobile theft from house police
Nashik Crime : मालेगावला व्याघ्रंबरी देवी मंदिरात चोरी; 24 तासात गुन्ह्याची उकल

गॅलरीत झोपलेल्या तरुणाचा मोबाइल चोरीला

जाधववाडी, हर्सूल परिसरातील शुभम इवरे हा विद्यार्थी मोबाईल आणि पैशांचे पाकिट असा २१ हजार २०० रुपयांचा ऐवज उशाला घेऊन गॅलरीत झोपला असता, चोरट्याने ऐवज लंपास केला. ही घटना १५ मेरोजी मध्यरात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक फौजदार वाघ करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.