Crime News : शेतकऱ्यांच्या वेषात गेले अन् फरारीला घेऊन आले!

ग्रामीण पोलिसांचा आरोपींना पकडण्याचा धडाका
crime update rural police chasing from 13 years arrest accused manish Kalwania
crime update rural police chasing from 13 years arrest accused manish Kalwaniasakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मागील काही वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यात अनेक फरार तसेच पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याचा धडाका ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सुरु केला आहे.

बनावट खत विक्री प्रकरणात तब्बल १३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला वीरगाव पोलिसांनी चक्क शेतकऱ्यांच्या वेशात जाऊन पुणे जिल्ह्यातील एका किराणा दुकानातून अटक करुन आणले. अभिजीत भालचंद्र थोरात (४१, रा. नाथाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी सांगितले की, २ जुलै २०१० रोजी इंदौरच्या एका कंपनीने बनावट खत विक्री केल्याच्या प्रकरणात रेवनाथ निवृत्ती सोनवणे (रा. गाढे पिंपळगाव) या कृषी सेवा केंद्रचालकासह इतर नऊ अशा दहा एकूण जणांविरोधात वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.

हे खत विक्री करणाऱ्या साखळीत अभिजित हा आरोपी होता. या गुन्ह्यातील आठजणांना आजवर अटक करण्यात आली होती, तर अभिजित आणि त्याचे वडील हे फरारी होते. दरम्यान २०१५ साली आरोपी अभिजित याचे वडील मरण पावले तर हा फरार होता. आरोपी अभिजित हा तब्बल १३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत राहण्याची ठिकाणे बदलत होता.

crime update rural police chasing from 13 years arrest accused manish Kalwania
Crime News : उन्हाळ्यात घर उघडे ठेवून झोपताय? मग चोरी झालीच म्हणून समजा!

सध्या वीरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना एसपींच्या आदेशानुसार तपासाची चक्रे फिरविली असता, आरोपी अभिजित याने मुळ गाव सोडून पुणे जिल्ह्यातील यवत येथे नाव बदलून राहत असून त्याने एक किराणा दुकान सुरु केल्याची माहिती एपीआय रोडगे यांना मिळाली.

crime update rural police chasing from 13 years arrest accused manish Kalwania
Crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ तर मुलीचा विनयभंग करुन धमकी; 10 जणांवर गुन्‍हा दाखल

रोडगे यांच्या पथकाचे उपनिरीक्षक नवनाथ कदम, अंमलदार विजयसिंग खोकड यांना सदर कामगिरीसाठी पाठविण्यात आले. अनोळखी भागातून आरोपीला पकडून आणणे हे जोखमीचे असल्याने पोलिसांनी शक्कल लढवत उपनिरीक्षक कदम, खोकड यांनी वेषांतर केले.

crime update rural police chasing from 13 years arrest accused manish Kalwania
Chatrapati Sambhajinagar News : मराठा व कुणबी एकच त्यांचा इतर मागासवर्गी वर्गात सरसकट समावेश करावा

शेतकऱ्याचा वेश परिधान केला, खासकरुन पश्चिम महाराष्ट्रातील गांधी टोपी घालत दोघांनी यवत पोलिसांना कळवत त्यांच्या मदतीने अभिजित याच्या किराणा दुकानात जात त्याला अटक केली. ही कारवाई अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर अधीक्षक सुनिल कृष्णा लांजेवार, सहायक अधीक्षक महक स्वामी, सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्सनाखाली उपनिरीक्षक नवनाथ कदम, अंमलदार विजयसिंग खोकड यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()