Chhatrapati Sambhajinagar Crime : पहाटे मंगळसूत्र चोरी, अन् दुपारी पाणीपुरी!

मॉर्निंग वॉकला, मंदिरात जाणाऱ्या महिलांना हेरायचे. योग्य ठिकाण, वेळ निवडून मंगळसूत्र हिसकावायचे.
Crime
CrimeSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मॉर्निंग वॉकला, मंदिरात जाणाऱ्या महिलांना हेरायचे. योग्य ठिकाण, वेळ निवडून मंगळसूत्र हिसकावायचे अन् संशय येऊ नये म्हणून दुपारी कोणी पाणीपुरी, तर कोणी लॉन्ड्रीच्या दुकानात काम करायचे. महिला, वृद्धांना टार्गेट करत चोरीचा जणू चोरट्यांनी धंदाच थाटला होता.

मात्र, गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी अचूक निरीक्षणे करुन दोघांना आठ जूनरोजी बनावट क्रमांकाच्या दुचाकी, चोरीच्या दागिन्यांसह पकडले. संतोष पांडुरंग इष्टके (२९ रा. कायगाव, सध्या रा. बजाजनगर) आणि निखील बाबासाहेब कुऱ्हे (२१ रा. राघू हिवरे, ता. पाथर्डी, जि.नगर, सध्या रा. कमळापूर, रांजनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

मागील काही दिवसांपासून मंगळसूत्र चोरट्यांनी चक्क पोलिसांना आव्हान दिले होते. या घटनांमध्ये बहुतांश महत्वाचे पुरावे हाती लागले आणि अखेर चोरट्यांचा माग काढून नगर रस्त्यावरील एएस क्लबदरम्यान चोरटे असल्याचा शोध लागला.

असे सापडले आरोपी

नगर रस्त्‍यावर संशयास्पद दुचाकींना थांबवून चौकशी करण्याचे काम गुन्हे शाखा सहायक निरीक्षक काशिनाथ महांडुळे, उपनिरीक्षक वाघ यांचे पथक करत होते. त्याचदरम्यान वरील दोघे चोरटे तिथून जाताना संशयास्पद दिसल्याने त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्याच्याकडील दुचाकीचा क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. त्यांना ताब्यात घेत थेट पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. दरम्यान चौकशीअंती आरोपींनी शहरातील विविध ठिकाणी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तसेच मंदीरात जाणाऱ्या महिला, वृद्धा यांचे तब्बल १० मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

Crime
Jalana Crime : डुकरे नेण्यावरून एकाचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोणत्या हद्दीतून किती चोऱ्या?

सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन मंगळसूत्र हिसकावले, क्रांती चौक दोन, एमआयडीसी वाळूज परिसरातून तीन मंगळसूत्र, छावणी आणि पुंडलिकनगर परिसरातून प्रत्येकी एक असे एकूण दहा मंगळसूत्र चोरी केल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त मनोज लोहिया, उपायुक्त अपर्णा गिते, सहायक आयुक्त धनंजय पाटील, गुन्हे शाखा निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक काशीनाथ महांडूळे, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, उपनिरीक्षक अजहर कुरेशी, पोलीस कर्मचारी नवनाथ खांडेकर, योगेश नवसारे, विजय भानुसे, विजय घुगे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, कैलास काकड, अश्वलिंग होनराव, राजेंद्र साळुंके, अमोल शिंदे, राहुल खरात, सुनील बेलकर, दिपाली सोनवणे, गिता ढाकणे, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.

Crime
Lizard : पाण्याच्या बाटलीत आढळली पाल; नर्सिंगच्या चौघींना चक्कर, उलटीचा त्रास

चोरीचे मंगळसूत्र खरेदी करणाऱ्यांवर कारवाई कधी?

चोरट्यांनी चोरीचे मंगळसूत्र काही ज्वेलर्समध्ये विक्री केले. त्या ज्वेलर्समध्ये जाऊन पोलिसांनी चोरीचे मंगळसूत्र जप्त करुन आणले आहेत. एकूण दागिने हे १० तोळे ५ ग्रॅम ३६० मिली वजनाचे असून या दागिन्यांची किंमत सहा लाख ३० हजार रूपये इतकी असल्याचे गुन्हे शाखेतर्फे सांगण्यात आले.

मात्र चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या गंगापूरचा बाबुसेठ ज्वेलर्स, कमळापूरचा धुळदेव ज्वेलर्स, गंगापूरचा कृष्णा ज्वेलर्स आणि बजाजनगरचा ओम ज्वेलर्स या चार ज्वेलर्सविरोधात गुन्हे दाखल होणार की नाही असा प्रश्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.