बळिराजावर दुबार पेरणीचे संकट?

पिके जगवण्यासाठी ठिबक सिंचन, स्प्रिंकलरचा वापर
Crisis of double sowing on Baliraja
Crisis of double sowing on BalirajaSakal
Updated on

चिंचोली लिंबाजी - चिंचोली लिंबाजी (ता. कन्नड) परिसरात पावसाळ्याच्या सुरवातीला दोन दमदार पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी मका व कपाशीच्या पेरण्या आटोपत्या केल्या. मात्र, नंतर पावसाने आठवडाभराची उघडीप दिल्याने शेतकरी ठिबक सिंचन तसेच स्प्रिंकलरच्या मदतीने पिके जगवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र परिसरात आहे.

गेल्या आठवड्यात हवामान विभागाने शनिवारी (ता. १८) पासून सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले. मात्र, पाऊस तर आलाच नाही. परंतु कडक ऊन, व दमट वातावरणामुळे पीक परिस्थिती बिकट झाली. इंधनाची दरवाढ झाल्याने यांत्रिकी मशागतीला अधिक खर्च, शिवाय खते व बियाण्यांचे वाढत्या भावामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी सावकारी पैशांची साथ करून तर काहींनी कसाबसा पैसा उपलब्ध करून पेरणीसाठी कंबर कसली होती.

मात्र, पावसाच्या लहरीपणापुढे शेतकऱ्यांनी आपले गुढघे टेकल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे. दिवसभर ढग दाटून येतात तर काही काळ कडक ऊन पडते दुसरीकडे सोसाट्याचा वारा सुरुच असल्याने जमिनीतील ओलावा संपून त्या कडक पडल्या आहे. या कडक जमिनीवरील पापडीतून कशीबशी कपाशीचे झाडे कोंब काढून वर येण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे.

परिसरात येत्या दोन दिवसात पावसाचे आगमन झाले तर काही अंशी पिके तग धरण्याची शक्यता आहे. नसता दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. सध्या तरी शेतकरी ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापर करून पीक जगविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास ढग दाटून आले होते. मात्र, काही वेळ रिमझिम पावसाने हजेरी लावली. नंतर आकाश पांढरेफटक झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.