छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या ओवाळणीचे तीन हजार रुपये खात्यात जमा केले. परंतु, अनेक लाभार्थी महिलांचे दोन ते तीन खाते असल्यामुळे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले, हेच कळेना. त्यामुळे महिला विविध बँकामध्ये गर्दी करत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख ९९ हजार महिलांना लाभ मिळाला.