औरंगाबादेतील वाढत्या गुंडगिरीवर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
Updated on

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी औरंगाबादेत उद्योजकांवर होणाऱ्या घटनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात श्री.फडणवीस म्हणतात, की उद्योगनगरी औरंगाबादेमध्ये (Crime Incidents In Aurangabad) सातत्याने उद्योजकांवर हल्ले होते असण्याच्या घटना अलीकडच्या काळात प्रकाशात आल्या आहेत. ता.८ ऑगस्ट रोजी भोगले उद्योग समूहाचे (Bhogale Industry Group) प्रबंध संचालक नित्यानंद भोगले, उत्पादन व्यवस्थापक श्री.सोनगीरकर, कार्मिक व्यवस्थापक भूषण व्याहाळकर या तिघांना बाहेरुन आलेल्या १५-२० कथित गुंडांनी मारहाण केली. या संदर्भातील संपूर्ण फुटेज पोलिसांकडे उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची चिथावण नसताना ही मारहाण झाली आहे. या प्रकरणातील काही आरोपींना अटक झाली तर काही फरार आहेत. ता.१० ऑगस्ट रोजी वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या श्री. गणेश कोटिंग समूहावर हल्ला करण्यात आला. लेबर काँन्ट्रॅक्ट आम्हाला द्या. या मागणीसाठी हे लोक गेले होते. या दोन घटनांनंतर आता इतरही अनेक छोट्या उद्योगांच्या समस्या पुढे येत असल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात श्री.फडणवीस सांगतात.

Devendra-Fadnavis-Uddhav-Thackeray
'मोदी आत्ममग्न नेतृत्व, सर्वकाही मीच करतो हे दाखविण्याचा प्रयत्न'

पेट्रोल भरुन पेट्रोलचे पैसे न देणे, हाॅटेलमध्ये जेवल्यावर त्याचे पैसे न देणे, वाहनांची दुरुस्ती केल्यावर त्याचे पैसे न देणे, अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत. विशेषतः अलीकडच्या ८-१० महिन्यांत अशा तक्रारी वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा प्रकरणात पोलिसांत तक्रारी झाल्यानंतर सामान्य कलमांन्वये कारवाई होते. परिणाम वर्षोनुवर्ष न्यायालयात तक्रारी प्रलंबित राहतात आणि कितीतरी वर्षांनी शिक्षा सुनावली जाते. अशा घटना सातत्याने घडत राहिल्यास त्याचा राज्यात गुंतवणूक येण्याच्या प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. शिवाय एक वेगळे चित्र गुंतवणूकदारांच्या मनात उभे राहते. त्यामुळे महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक यावी. यातून मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी अशा घटनांकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या सर्व घटनांमध्ये कठोरातील कठोर कलमे लावून हे खटले जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोवर या कथित गुंडांवर जरब बसणार नाही. आपण स्वतः यात लक्ष घालून तातडीने कारवाई कराल, ही आशा करतो, अशी अपेक्षा पत्राच्या शेवटी श्री.फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()