Navratri Festival : भक्तांची अनोखी माया! तुळजाभवानी मातेच्या चरणी तब्बल 5 कोटींचं भरभरुन दान; सोने-चांदीही अर्पण

नवरात्रोत्सव १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान साजरा झाला.
Tuljabhavani Mata Navratri Festival Tuljapur
Tuljabhavani Mata Navratri Festival Tuljapuresakal
Updated on
Summary

नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी मातेला भाविकांनी सोने-चांदी अर्पण केली.

तुळजापूर : नवरात्रोत्सवात (Navratri Festival) तुळजाभवानी मंदिराला विविध माध्यमांतून पाच कोटी ६ लाख ८९ हजार ८४६ रुपयांचे उत्पन्न दान मिळाले. नवरात्रोत्सव १५ ते ३० ऑक्टोबरदरम्यान साजरा झाला.

मंदिर समितीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देणगी दश॔नातून दोन कोटी २५ लाख ५२ हजार ९०० रुपये मिळाले. सिंहासन पेटीतून १ कोटी ४८ लाख ८३ हजार ३५०, मंदिरातील विविध दान पेट्यांत भाविकांनी अर्पण केलेले तून १ कोटी २ लाख ३८ हजार ९२०, विश्वस्त निधीमध्ये २३ लाख ४९ हजार ९९० रुपये मिळाले आहेत.

Tuljabhavani Mata Navratri Festival Tuljapur
Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकीची महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार? मराठा क्रांती मोर्चाचा दादांना तीव्र विरोध

तुळजाभवानी मातेला अनेक भाविक टपालाने पैसै (मनी ऑर्डर) पाठवतात. या माध्यामातून २ लाख ३२ हजार ४८४ रुपये मंदिराला मिळाले. धनादेशाद्वारे १ लाख ९२ हजार, ऑनलाइन देणगीमधून १ लाख ५० हजार ३४७, नगद अप॔णच्या माध्यमातून १३ हजार ६२६, गोंधळी, जावळ आदींतून १ हजार ३२० रुपये मंदिराला मिळाले.

Tuljabhavani Mata Navratri Festival Tuljapur
Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात आढळले तब्बल 20 हजार 'कुणबी'; शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक नोंदी!

एक किलो सोने, १७ किलो चांदी

नवरात्रोत्सवाच्या काळात तुळजाभवानी मातेला भाविकांनी सोने-चांदी अर्पण केली. १५ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबरदरम्यान सुमारे एक किलो सोने तर १७ किलो चांदी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.