Chhatrapati Sambhajinagar Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी

Adul Latest news in marathi |अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर एक जखमी झाला ...
dhule solapur national highway accident Bike rider killed One injured
dhule solapur national highway accident Bike rider killed One injuredSakal
Updated on

आडुळ : भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२४) रोजी राञी साडे अकरा वाजेच्या सुमारास धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ ता. पैठण शिवारात घडली. अवधुत माणिकराव वाघ वय ४३ वर्षे असे नाव आहे तर राधाकिसन बाबुराव वाघ वय ४५ वर्षे हे जखमी आहे.

अवधुत वाघ व राधाकिसन वाघ हे मंगळवारी राञी साडे अकरा वाजेच्या सुमारास महामार्गावरील आडुळ शिवारातील एका हॉटेल वर चहा घेवुन त्यांच्या दुचाकी क्रमांक एच एच २० एफ आर ६५७२ ने परत येत असतांना बिडकडुन भरधाव वेगाने येणारया एका अज्ञात बोलेरो टॅम्पोने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात अवधुत वाघ हे जागीच ठार झाले तर राधाकिसन वाघ हे गंभीर जखमी झाले.

अपघात होताच पाचोड पोलीस ठाण्याच्या गस्तीवर असलेल्या वाहनाने सदरील जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. अपघातानंतर सदरील अज्ञात वाहन घटनास्थळावरुन पसार झाले त्याचा आडुळ येथील नागरिकांनी पाठलाग केला माञ तो हाती लागला नाही.

अवधुत वाघ हे नामदेवराव विनायक पाटिक विद्यालय नांदर येथील शिपाई म्हणुन कार्यरत होते त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आई, वडील असा परिवार आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढिल तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार जगन्नाथ उबाळे, रणजितसिंग दुलत हे करीत आहे.

चहाची सवय जिवावर बेतली

दररोज आडुळ गावातुन अनेक नागरीक महामार्गावर असलेल्या हॉटेलवर चहा घेण्यासाठी जातात . अवधुत वाघ व राधाकिसन वाघ हे ही नेहमी राञीच्या वेळ चहा घेण्यासाठी येथील हॉटेल वर जात होते. काल पण त्यांनी चहा घेतल्यानंतर परत आडुळ कडे येत असतांना हा अपघात झाला व यात अवधुत वाघ यांचा मृत्यु झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.