Dharashiv Crime News : राष्ट्रीय महामार्गावर वाटमाऱ्यांचा अड्डा

पोलिसांसमोर चोऱ्या रोखण्याचे आव्हान, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
dharashiv
dharashiv sakal
Updated on

धाराशिव : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लुटारुंचा अड्डा बनला आहे. महिन्यातून किमान चार ते पाच घटना जिल्ह्याच्या हद्दीत होत असून पोलिसांसमोर लुटारुंनी आव्हान उभे केले आहे. तर दुसरीकडे प्रवासी वर्गातही याची दहशत पसरत असून हैदराबाद येथून शिर्डीला जाणाऱ्या काही भक्तांनी या महामार्गाला टाळून प्रवास करणे पसंत केले आहे.

येरमाळा (ता. कळंब) ते वाशी पोलिस स्टेशनची हद्द या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर लुटारूकडून प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकार नित्याचा झाला आहे. महिन्यातून किमान चार ते पाच घटना होत आहेत. विशेष म्हणजे एकसारख्या घटना अन् त्याच अंतरात घडत असतानाही पोलिसांना आरोपी सापडत नसल्याने पोलिसांच्या समोर लुटारुंनी आव्हान दिल्याचे चित्र आहे.

अशा घडत आहेत घटना

हैदराबाद येथील अनेक भाविक शिर्डीच्या दर्शनासाठी जातात. हैदराबाद येथून सायंकाळच्या सुमारास निघाल्यानंतर पहाटेच्या वेळी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत येतात. अशा प्रवाशांच्या गाडीच्या खाली जॅक टाकला जातो. त्यानंतर खडखड आवाज आल्याचे चालकाच्या लक्षात येताच गाडी थांबविली जाते. तेव्हा दबा धरून बसलेले लुटारू येऊन भाविकांकडील ऐवज घेऊन फरार होतात. प्रसंगी मारहाण करण्याचाही प्रयत्न होतो. तर जॅक टाकून गाडी उलटण्याचे होण्याचे प्रकारही घडले आहेत. तर चालत्या वाहनातील टार्पोलीन (ताडपत्री) फाडून आतील साहित्य लंपास केले जाते. याशिवाय धाब्यावर थांबलेल्या तसेच चालत्या गाडीच्या डिक्कीतून साहित्य पळविणे, असे प्रकार सातत्याने होत आहेत.

dharashiv
Dharashiv News : तुळजापूरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने दाखविले काळे झेंडे

मागच्या दहा दिवसात तीन घटना

२९ सप्टेंबर २०२३ च्या रात्री विद्यार्थी अमरावतीकडे निघाले होते. त्यांच्या बॅग तसेच कपडे असा एकूण ४० हजार रुपयांचा माल वाशी पोलिस स्टेशनच्या हद्दीतून लंपास केला. त्यानंतर गोवा राज्यातील आद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणासाठी विदर्भ दौऱ्यावर जात होते. त्यांची टेंम्पो ट्रॅव्हल तीन डिसेंबरला पार्डी फाटा (ता. भूम) हद्दीत एका पेट्रोल पंपाच्या समोर उभी करून झोपले होते. त्याचवेळी चोरट्यांनी त्यांच्या गाडीतील रोख रक्कम, शासकीय साहित्य, ओळखपत्र, पॅनकार्ड असे साहित्य घेऊन पसार झाले. वाशी पोलिस ठाण्यात याचा गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय राजस्थान राज्याचा एक ट्रक तामिळनाडू येथून गुजरातच्या दिशेने जात होता.

राजस्थान राज्याचा एक ट्रक तामिळनाडू येथून टायर घेऊन गुजरातच्या दिशेने जात होता. तीन डिसेंबरच्या रात्री तेरखेडा (ता. वाशी) येथील उड्डान पुलावरून जात असताना दोन आरोपींनी चालत्या ट्रकवर चढून ताडपत्री फाडून साहित्य काढून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत येरमाळा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाने तक्रार दिली आहे.

dharashiv
Nanded News : मनोज जरांगे पाटील यांच्या आज चार सभा

पोलिसांची लुटारुंसमोर शरणागती?

गेल्या अनेक दिवसांपासून अशा घटना घडत आहेत. तपासात अत्याधुनिक यंत्रणा पोलिसांकडे आहे. पेट्रोलिंग सुरू असते. त्याच ठिकाणी अन तशाच घटना घडत आहेत. मात्र, अद्यापही त्यावर नियंत्रण येत नाही. मुख्य आरोपींपर्यंत पोहचता येत नाही. त्यामुळे लुटारुंच्या विरोधात पोलिस पराभूत झाले असल्याची भावना प्रवाशी वर्गात होत आहे. परिणामी हैदराबादहून शिर्डीकडे जाणारे भाविक आता सोलापूरच्या मार्गास प्राधान्य देत आहेत.

dharashiv
Latur News : बुद्धिबळ स्पर्धेत ओंकार पाटील विजेता

वाहन रस्त्यावरून धावत असतानाही त्यातून सामान चोरून नेण्याचे प्रकार आमच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडले आहेत. या घटनांचा तपास आम्ही वेगाने सुरू केला आहे. लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकण्याचा आमचा प्रयत्न आहे. वाहनचालकांनीही वाहन चालवित असताना अशा प्रकारांप्रती जागरूक राहायला हवे.

- अतुल पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक, येरमाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.