Aurangabad | डिझेलच्या तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा, नागरिकांची पळापळ

सिल्लोडसह तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपला
Diesel Shortage In Sillod Taluka Of Aurangabad
Diesel Shortage In Sillod Taluka Of Aurangabadesakal
Updated on

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : शहरासह तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपल्यामुळे सोमवार (ता.30) रोजी ठिकठिकाणी वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत. अचानक डिझेलचा तुटवडा (Diesel Shortage) झाल्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर डिझेल मिळविण्यासाठी रिकाम्या कॅन देखील रांगेत ठेवल्या आहेत. शेतीशिवारात खरीप हंगामाची लगबग सुरू असतांना ट्रॅक्टर, जेसीबी यंत्राने सुरू असलेली कामे देखील ठप्प झाली आहेत. (Diesel Shortage In Sillod Of Aurangabad, People Long Line At Petrol Pump)

Diesel Shortage In Sillod Taluka Of Aurangabad
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही - संजय राऊत

अनेक पंप चालकांनी होणारी वादावादी बघता नो स्टॉकचे फलक लावल्याने आल्या पावली वाहनचालक परत फिरत असले तरी, डिझेल मिळविण्यासाठी सिल्लोड (Sillod) तालुक्यात नागरिक दुचाकी वाहनांवरुन कॅन घेऊन जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रविवार दुपारपासून शहरातील पंपावर डिझेलचा साठा संपला होता. आता डिझेल मिळणार केव्हा या चिंतेमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर रिकाम्या कॅनच्या रांगा लावल्या आहेत. (Aurangabad)

Diesel Shortage In Sillod Taluka Of Aurangabad
आमदार रमेश बोरनारेंच्या अडचणीत वाढ,भावजयीने केले गंभीर आरोप

मागणी व पुरवठ्यात तफावत

मिळालेल्या माहितीनुसार बीपीसी व एचपीसी कंपन्यांनी क्रेडिट बंद केल्यामुळे डिझेलच्या पुरवठ्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याचबरोबर मागील आठवड्यात इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने इंधनाची मागणी देखील वाढली आहे. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने अनेक पंप चालकांना बँक व्यवहार करण्यासाठी अडचण झाली. त्यामुळे देखील इंधनाचा तुटवडा निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.