कुपोषित बालकांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाकडून आहारात बदल

राज्यपातळीवर शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जातो.
कुपोषित बालकांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाकडून आहारात बदल
Sakal
Updated on

कुपोषणमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी बालके या दृष्टचक्रातून बाहेर पडत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीत शून्य ते ५ वयोगटातील मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) ६,७५६ व अतितीव्र कुपोषित (सॅम) १,९०५ बालके आढळून आली आहेत. या बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड (ईडीएनएफ) आहार देऊन त्यांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये २४२३ अंगणवाडी सेविका तर २५८४ मदतनीस कार्यरत आहेत. जिल्ह्यातील या अंगणवाड्यांमधून जवळपास दोन लाख बालके प्राथमिक पूर्व शिक्षण घेतात. तसेच अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालके, स्तनदा माता, गरोदर मातांना पोषण आहार, तसेच बालकांना पूर्व प्राथमिकचे शिक्षण दिले जाते.

राज्यपातळीवर शासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जातो. मात्र, नऊ महिन्यांपासून जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढलेली आहे. प्रशासनाकडून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे, मात्र अद्याप कुपोषित बालकांची संख्या हवी तशी कमी झालेली नाही.

कुपोषित बालकांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाकडून आहारात बदल
Nagar - Kopargaon Highway: पहिल्या पावसातच महामार्गाचे तीनतेरा, प्रवास ठरतोय जीवाशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

कुपोषण कमी करण्याचे प्रयत्न

गेल्या काही महिन्यांपूर्वीपर्यंत अंगणवाड्यांमधून बालकांना कडधान्याच्या स्वरूपात पोषण आहार उपलब्ध करून देण्यात येत होता. परंतु, जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या बघता या महिन्यापासून अंगणवाडीतील बालकांना ‘मल्टी मिक्स सिरियल्स ॲण्ड प्रोटिन्स प्रिमिक्स फूड’ तसेच ‘एनर्जी डेन्स तूर डाळ प्रिमिक्स फूड’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. बालकांची वैद्यकीय तपासणी, पालकांचे समुपदेशन केले जात आहे. मातांना आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.