Leprosy Disease : देशात सर्वाधिक १७ हजार कुष्ठरुग्ण महाराष्ट्रात!

२०२१-२२ वर्षात संख्या वाढली; आजाराचे वेळेत निदान आणि उपचार आवश्‍यक
disease maharashtra country thousand patients increased diagnosis
disease maharashtra country thousand patients increased diagnosissakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : देशात २०२१-२२ या वर्षात ७५ हजार ३९४ कुष्ठरुग्ण आढळले असून त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातील १७ हजार १४ रुग्ण आहे. त्या खालोखाल बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे.

कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. कुष्ठरोगाचे जीवाणू प्रामुख्याने हातपायांच्या शिरा आणि त्वचेवर विपरित परिणाम करतात. कुष्ठरोगामुळे बाधित भागावर जखमा होतात.

देशात ७५ हजार रुग्णसंख्या

देशात २०१४-१५ मध्ये कुष्ठरोगींची संख्या एक लाख १५ हजार ७८५ होती. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राबविलेल्या उपाययोजना, उपचार पद्धतीमुळे कुष्ठरुग्णांची संख्या घटली. देशात २०१९-२० या वर्षी एक लाख १४ हजार ४५१ कुष्ठरुग्ण होते. यात पुढील वर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये जवळपास ४३ टक्क्यांची घट होऊन रुग्णांची संख्या ६५ हजार १४७ आली.

disease maharashtra country thousand patients increased diagnosis
Lumpy Skin Disease : लंपी स्कीन पुणे जिल्ह्यात पुन्हा संशयित रुग्ण आढळले

मात्र २०२१-२२ या वर्षात १५.७ टक्क्यांची वाढ होऊन रुग्णांची संख्या ७५ हजार ३१४ झाली आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम (एनएलईपी) मध्ये दरवर्षी केंद्राकडून राज्यांना निधी दिली जातो. यात महाराष्ट्राला २०१९-२० या वर्षी ४.८३ कोटी, २०२०-२१ या वर्षी ३.७६ कोटी तर २०२०-२१ या वर्षी २.१२ कोटी रुपये देण्यात आले.

कुष्ठरोगाचे प्रकार आणि निदान

कुष्ठरुग्णाचे तीन प्रकार वर्गीकरण केले गेले आहे. यात ‘ट्युबरक्युलॉइड कुष्ठरोग’, ‘लेप्रोमेटास कुष्ठरोग’ आणि ‘बॉर्डर लाइन’ असे तीन प्रकार विभागले गेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने कुष्ठरोगाचे ‘पॉकीबॅकिलरी’ आणि ‘मल्टिबॅकिलरी’ असे वर्गीकरण केले आहे.

‘पॉकीबॅकिलरी’ प्रकारात त्वचेवर पाचपेक्षा कमी चट्टे असतात तर ‘मल्टीबॅकिलरी’ प्रकारात पाचपेक्षा जास्त कुष्ठरोगाचे चट्टे असतात. या प्रकारावरुन उपचार ठरविले जातात. कुष्ठरोगाचे निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणे, चट्ट्यांचे कारण अधिक स्पष्ट होण्यासाठी त्वचेचा छोटा तुकडा काढून प्रयोगशाळेत बायोप्सी तपासणी केली जाते. याशिवाय यासाठी लेप्रोमिन ही तत्वेचा चाचणी सुद्धा करतात.

अशी आहेत लक्षणे

  • त्वचेवर पांढरट किंवा लालसर चमकदार चट्टे येणे

  • मांसपेशी दुर्बल व कमकुवत होणे

disease maharashtra country thousand patients increased diagnosis
Kidney Disease: सावधगिरीतून टाळा मूत्रपिंडाच्‍या व्‍याधी; उन्हाच्या तडाख्यात द्रवपदार्थांचे सेवन ठरते हितकारी!
  • हात, पाय सुन्न पडणे, बधीर होणे

  • बोटे वेडीवाकडी होणे

  • बाधित भागाच्या संवेदना कमी होणे

देशातील कुष्ठरोग असलेल्यांची संख्या

(जानेवारी २०२३ पर्यंतची आकडेवारी)

महाराष्ट्र १७,०१४

बिहार ११,३१८

उत्तर प्रदेश १०,३१२

छत्तीसगड ७,४२२

मध्य प्रदेश ७,३१३

झारखंड ६,१८४

ओडीसा ६,०८८

पश्‍चिम बंगाल ५,०१२

आंध्र प्रदेश २,७६९

गुजरात २,६६२

कर्नाटक २,०९१

तमिळनाडू २,५९१

तेलंगणा २,५६४

दिल्ली १,१८८

राजस्थान ९६९

आसाम ७१९

disease maharashtra country thousand patients increased diagnosis
Dangerous Disease : एकाएकी महिला रशियन बोलायला लागली, तपासणी केली अन् निघाला हा गंभीर आजार

हरियाणा ३६६

हिमाचल प्रदेश १३२

पंजाब ३६५

केरळ ३८४

उत्तराखंड २९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.