छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेपाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्णा योजना सरकारने आणली आहे. पूर्वीच्या उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षातून तीनवेळा मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. २२) ५४ हजार ५७४ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.