Sambhaji Nagar Crime : शेअर मार्केट ट्रेडिंगचे आमिष ;डॉक्टरला पडले ९० लाखांत!

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरसह त्याच्या नातेवाइकांची ९० लाखांची फसवणूक झाली.
share market fraud
share market fraudsakal
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून डॉक्टरसह त्याच्या नातेवाइकांची ९० लाखांची फसवणूक झाली. जून २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत शहागंज भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी आरोपीने तोटा झाला असल्याचे सांगत पोबारा केला. सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी डॉ. मुराद मोहमद अली कुडचीवाला (वय ४९ रा. ग्रिन व्हॅली) यांनी तक्रार दाखल केली. डॉ. मुराद हे विविध खासगी हॉस्पीटलमध्ये प्रॅक्टीस करतात. या निमित्ताने त्यांची ओळख शहागंजमधील प्रीतम मेडीकलचा वृषभ अनिल अजमेरा याच्यासोबत झाली होती. अजमेरा याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडींग करतो, असे सांगितले होते.

यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने डॉ. मुराद यांना दाखवले होते. डॉ. मुराद यांनी विश्वास ठेवत सुरवातीला काही रक्कम गुंतवल्यानंतर अजमेरा याने त्यांना दरमहा परतावा देणे सुरु केले होते. .

यानंतर अजमेरा यांच्यासोबत ओळख वाढल्याने त्याच्या सांगण्यावरुन डॉ. मुराद यांनी आणि त्यांच्या इतर शहरातील नातेवाईकांनी सुमारे ९० लाख रुपये अजमेराच्या खात्यावर ट्रेडींससाठी जमा केले. यापैकी अजमेरा याने त्यांना २० लाख रुपयांचा परतावा नफा स्वरुपात परत केला. एप्रिल २०२३ नंतर अजमेरा याने परतावा देणे बंद केले.

मुराद यांनी विचारणा केली असता अजमेरा याने ब्रोकर फर्मकडून पैसे मिळत नसून खाते ब्लॉक झाले असल्याची थाप मारली. डॉ. मुराद यांनी पाठपुरावा केला असता अजमेरा याने मला शेअर मार्केटमध्ये तोटा झाला असून माझ्याकडे पैसे आल्यानंतर परत करेल, असे सांगितले. यानंतर संशयित अजमेरा याने मोबाईल बंद करून पोबारा केला. या प्रकरणी डॉ. मुराद यांच्या तक्रारीवरून वृषभ अजमेरा विरुद्ध गुन्हा नोंद झाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.